- विश्वास पाटीलकोल्हापूर : माजी खासदार संजय मंडलिक यांनी विधानसभा निवडणुकीवेळी सुरतेचा खजिना लुटला असा पैसा लुटणारा एक राजकीय पुढारी जनतेचा नेता कसा होवू शकतो असे प्रत्युत्तर वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी रात्री दिले. मंडलिक यांनी मुश्रीफ यांनी ईडीपासून वाचण्यासाठी समरजित घाटगे यांच्याशी युती केल्याचा आरोप केला होता. त्याला मुश्रीफ यांनी हे प्रत्युत्तर दिले.
या व्हीडीओमध्ये मुश्रीफ म्हणाले, ईडीकडून वाचण्यासाठी मी युती केली हे मंडलिक यांचे अज्ञान आहे. कारण ईडीच्या सर्व आरोपातून माझी निर्दोष मुक्तता याआधीच झाली आहे. घाटगे यांच्याही इतक्या जमीन आहेत की एका जमिनीच्या तुकड्यासाठी ते युती करणार नाहीत. सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्या संघर्षात १० खून झाले होते. परंतू ते ज्या भूमिकेतून एकत्र आले त्यांचाच आदर्श आम्ही घेतला आहे. आम्ही जनतेचा विश्वासात घात कधीच केला नाही म्हणून अजूनही जनतेत टिकून आहे.
आम्ही जनतेचा विश्वासघात केलेला नाही. उलट लोकसभेला आम्ही दोघांनीही मंडलिक यांचे काम केले असताना त्यांनी आमच्यावर आरोप केले आहेत. विधानसभेला खजिना एखादा राजकीय पुढारी सुरत लुटायची आहे म्हणून खजिना लुटतो आणि खजिना लुटायचा आहे म्हणूनही पैसा लुटतो असा राजकीय पुढारी जनेतचा नेता कसा होवू शकतो असा सवालही मुश्रीफ यांनी उपस्थित केला. मुंबईतील नेत्यांच्या बैठकीतच मी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर मंडलिक आणि आमची युती होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. संजयबाबा घाटगे यांचेही समाधान झाले असून आम्ही तिघे आता तालुक्याचे राजकारण एकत्रितपणे करणार आहोत.
मंडलिक यांनी तोंड सांभाळून बोलावे..
संजय मंडलिक यांनी यापुढे तोंड सांभाळून बोलावे. त्यांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत..नाहीतर बात बहूत दूर तक जायेगी असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.