राज्यस्तरीय ऑनलाईन गायन स्पर्धेत संजय जाधव बेस्ट सिंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:19 IST2021-01-09T04:19:10+5:302021-01-09T04:19:10+5:30

इचलकरंजी : राज्यस्तरीय ऑनलाईन गायन स्पर्धेत येथील शाहीर संजय जाधव यांना बेस्ट सिंगर पब्लिक अवॉर्ड मिळाला. याबद्दल माजी खासदार ...

Sanjay Jadhav Best Singer in State Level Online Singing Competition | राज्यस्तरीय ऑनलाईन गायन स्पर्धेत संजय जाधव बेस्ट सिंगर

राज्यस्तरीय ऑनलाईन गायन स्पर्धेत संजय जाधव बेस्ट सिंगर

इचलकरंजी : राज्यस्तरीय ऑनलाईन गायन स्पर्धेत येथील शाहीर संजय जाधव यांना बेस्ट सिंगर पब्लिक अवॉर्ड मिळाला. याबद्दल माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी त्यांचा सत्कार केला.

या ऑनलाईन गायन स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर येथील फिल्म प्रोडक्शनने केले होते. लाईक्स, ह्युव आणि कमेंटस् या आधारे विजेते निवडण्यात आले. स्पर्धेमध्ये नेहा मोरे, विकास कांबळे व पूजा बामणे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आला. तसेच पूजा सुतार व संजय जाधव यांना चतुर्थ क्रमांक विभागून देण्यात आला. व्यक्तिगत प्रकारात शाहीर संजय जाधव यांनी बेस्ट सिंगर पब्लिक अवॉर्डचा मान मिळविला. त्यांना ८२६२ ह्युव, २०९१ लाईक्स व २९४ कमेंटस् मिळाल्या. याबद्दल त्यांचा आवाडे यांनी सत्कार केला. यावेळी मनोहर जोशी, बबलू कलावंत, आदी उपस्थित होते.

(फोटो ओळी)

०८०१२०२१-आयसीएच-०२

संजय जाधव यांना बेस्ट सिंगर पब्लिक अवॉर्ड मिळाल्याबद्दल माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी त्यांचा सत्कार केला.

Web Title: Sanjay Jadhav Best Singer in State Level Online Singing Competition