संजय घाटगेंचा अखेर शिवसेना प्रवेश निश्चित
By Admin | Updated: July 27, 2014 00:54 IST2014-07-27T00:54:17+5:302014-07-27T00:54:17+5:30
सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्याशी चर्चा

संजय घाटगेंचा अखेर शिवसेना प्रवेश निश्चित
कोल्हापूर : कागलमधील विधानसभेची टक्कर ही जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय घाटगे यांच्यातच होणार आहे. संजय घाटगे यांचा शिवसेनेतील प्रवेश निश्चित झाला असून लवकरच ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वेळ घेऊन मुंबईत किंवा त्यांच्या सूचनेप्रमाणे योग्य ठिकाणी ते प्रवेश करणार आहेत. आज, शनिवारी त्यांची याबाबत सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्याशी चर्चा झाली.
काही दिवसांपूर्वी घाटगे यांनी संपर्क नेते आ. दिवाकर रावते व अरुण दुधवडकर यांची भेट घेऊन आपण पक्षाकडून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी ठाकरे यांच्या सूचनेनुसार प्रथम पक्षात प्रवेश करा. नंतर उमेदवारीचे पाहू, असे सांगितले होते. तेव्हापासून घाटगे यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. त्यानंतर २० जुलैला उद्धव ठाकरे व शिवसेना गटनेते सुभाष देसाई यांच्याशी पक्षप्रवेशाबाबत घाटगे यांची चर्चा झाली. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षप्रवेशाचा घाटगे यांनी निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)