मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची चाकण येथे ब वर्ग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी बदली झाल्यामुळे आज पालिकेच्या वतीने त्यांना स्नेह निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेखान जमादार होते.
यावेळी अमर कांबळे, रणजित निंबाळकर, विनायक रणवरे, कॉ. बबन बारदेस्कर आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी मुख्याधिकारी गायकवाड यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी नगरसेवक उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, पक्षप्रतोद संदीप कलकुटकी, नगरसेवक बाजीराव गोधडे, विरोधी पक्षनेता राहुल वंडकर, मारुती कांबळे, रविराज परीट, विशाल सूर्यवंशी, नगरसेविका प्रतिभा सूर्यवंशी, सुप्रिया भाट, रंजना मंडलिक, बांधकाम अभियंता प्रकाश पोतदार,स्वप्निल बुचडे, अमोल गवारे, स्नेहल पाटील, दिलीप कांबळे,सुनील पाटील, बाळू शेळके, आकाश दरेकर, जयवंत गोधडे,रणजित निंबाळकर, सुनील पाटील, विजय साबळे, पुरुषोत्तम देसाई, विनय पाटील, ज्योती पाटील, प्राजक्ता पिंपळे,विजय मोरबाळे यांच्यासह आदी उपस्थित होते.
मुरगूड ता कागल येथील मुख्याधिकारी संजय गायकवाड यांचे बदली निमित्ताने सत्कार प्रसंगी नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, पक्षप्रतोद संदीप कलकुटकी, सर्व नगरसेवक नगरसेविका व अन्य.