शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आजारपणामुळे वडील अंथरुणाला खिळलेले; घर, शेती सांभाळत बारावी परीक्षेत संजना हिने यश मिळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 12:15 IST

घरात कोणीही उच्चशिक्षित नसताना शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रामाणिक कष्ट

कोल्हापूर : भवानी मंडपातील मेन राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी संजना धनाजी गोळे (रा. केर्ले, ता. करवीर) हिने वाणिज्य शाखेतून ८३.५० टक्के गुण मिळवत कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. आजारपणामुळे वडील अंथरुणाला खिळलेले असताना घर आणि शेती सांभाळणाऱ्या आईला मदत करत संजना हिने कोणतीही खासगी शिकवणी न लावता यशाला गवसणी घातली.केर्ले येथील संजना गोळे हिच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर ते अंथरुणाला खिळून आहेत. आई शेती सांभाळून संसाराचा गाडा हाकते. घरची बेताची परिस्थिती आणि वडिलांचे आजारपण लक्षात घेऊन आईला शेतीत आणि घरात मदत करून संजना हिने १२ वीचा अभ्यास केला. गणिताची आवड असल्यामुळे तिने वाणिज्य शाखा निवडली होती.घरात कोणीही उच्चशिक्षित नसताना शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रामाणिक कष्ट आणि आई-वडिलांचे प्रोत्साहन, या बळावर तिने १२ वीच्या परीक्षेत ८३.५० टक्के गुण मिळवत मेन राजाराम ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. पोलिस दलात करिअर करण्याची इच्छा तिने व्यक्त केली. वर्गशिक्षक राहुल देशमुख यांच्यासह विषय शिक्षक ए. एम. धुमाळ, ए. एस. पाटील आणि प्राचार्य व्ही. बी. डोणे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC Exam Resultबारावी निकाल