पन्हाळगडावर राजा शिवछत्रपती परिवाराच्यावतीने स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:27 IST2021-03-09T04:27:28+5:302021-03-09T04:27:28+5:30
महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात सध्या काम चालू असून मावळे त्या त्या जिल्ह्यातील ठरवलेल्या गडाचे संवर्धन करत असतात. कोल्हापूर विभागामार्फत देखील ...

पन्हाळगडावर राजा शिवछत्रपती परिवाराच्यावतीने स्वच्छता मोहीम
महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात सध्या काम चालू असून मावळे त्या त्या जिल्ह्यातील ठरवलेल्या गडाचे संवर्धन करत असतात. कोल्हापूर विभागामार्फत देखील कायम पन्हाळगडावर संवर्धनाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे.
गडावर अनेक पर्यटक भेट द्यायला येतात. त्यामुळे वेफर्स पाकीट, चॉकलेटचे कागद, मद्य प्राशन केल्यानंतर टाकलेल्या बाटल्या अशा अनेक वस्तू पडतात. परिवाराने हीच गोष्ट लक्षात घेऊन आपली ४० वी मोहीम नुकतीच प्लास्टिकमुक्त पन्हाळगड या संकल्पनेवर पार पाडली. यावेळी जमा झालेला कचरा पन्हाळा नगरपरिषदेकडे दिला.
यावेळी परिवारातर्फे प्लास्टिकमुक्त पन्हाळगडसाठी जिल्ह्यातील शिवशंभू पालकांनीही पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
फोटो ओळी :-
पन्हाळगडावर राजा शिवछत्रपती परिवाराच्यावतीने आयोजित स्वच्छता मोहिमेतील सहभागी सदस्य.