५६ महाबटालियन एनसीसीच्यावतीने स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:49 IST2020-12-11T04:49:36+5:302020-12-11T04:49:36+5:30

कोल्हापूर : ५६ महाबटालियन एनसीसी कोल्हापूर विभाग व कोल्हापूर महानगरपालिका यांच्यावतीने महाराणी ताराबाई विद्यालय पटांगण व हुतात्मा गार्डन येथे ...

Sanitation campaign on behalf of 56 Mahabatalian NCC | ५६ महाबटालियन एनसीसीच्यावतीने स्वच्छता अभियान

५६ महाबटालियन एनसीसीच्यावतीने स्वच्छता अभियान

कोल्हापूर : ५६ महाबटालियन एनसीसी कोल्हापूर विभाग व कोल्हापूर महानगरपालिका यांच्यावतीने महाराणी ताराबाई विद्यालय पटांगण व हुतात्मा गार्डन येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल उदय बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.

या स्वच्छता मोहिमेदरम्यान दीड टन कचरा गोळा करण्यात आला. तसेच हुतात्मा गार्डनमधील ऐतिहासिक पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली. मोहिमेत यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज, गोपाळकृष्ण गोखले कॉलेज, शाहू दयानंद हायस्कूल, इंदिरा गांधी स्कूलचे एकूण १०० एनसीसी कॅडेट व महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले. स्वच्छता मोहिमेत प्रा. लेफ्ट. अमित रेडेकर, फर्स्ट ऑफिसर अजित कारंडे, प्रा. डी. के नरळे, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, प्रा. कांबळे, प्रा. सोनार यांनी सहभाग नोंदविला.

Web Title: Sanitation campaign on behalf of 56 Mahabatalian NCC