संग्राम चौगुलेचे जंगी स्वागत
By Admin | Updated: December 17, 2014 23:56 IST2014-12-17T23:52:35+5:302014-12-17T23:56:29+5:30
८ डिसेंबरला मुंबई येथे झालेल्या सहाव्या मिस्टर वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले.

संग्राम चौगुलेचे जंगी स्वागत
कोल्हापूर : ८ डिसेंबरला मुंबई येथे झालेल्या सहाव्या मिस्टर वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेत कोल्हापूरच्या संग्राम चौगुलेने सुवर्णपदक पटकाविले. आज त्याचे कोल्हापुरात आगमन होताच ताराराणी पुतळा येथे फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत केले. महापौर तृप्ती माळवी यांनी त्यांच अभिनंदन केले.
या स्पर्धेत थायलंडच्या शरीरसौष्ठवपटूंवर मात करत संग्रामने ८५ किलो वजनगटात सुवर्णपदक पटकाविले. आज अकराच्या सुमारास त्याचे आगमन होताच ताराराणी पुतळा येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नरमार्गे शिवाजी पुतळा येथे मिरवणुकीची सांगता झाली. न्यू कोल्हापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनने मिरवणुकीचे आयोजन केले होते.
मिरवणुकीत धनंजय महाडिक युवा शक्ती, रामराजे कुपेकर, कोल्हापूर जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अभिजित मगदूम, न्यू कोल्हापूर डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डींग असो. सेक्रेटरी राजेश वडाम, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, नेताजी पाटील व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘मिस्टर वर्ल्ड शरीरसौष्ठव’ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता संग्राम चौगुलेचे आज, बुधवारी कोल्हापुरात आगमन झाले. यावेळी त्याची मिरवणूक काढली.