झिंगल स्पर्धेत संग्राम भालकर प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:17 IST2021-02-05T07:17:14+5:302021-02-05T07:17:14+5:30
कोल्हापूर : महापालिकेकडून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत घेण्यात आलेल्या झिंगल, शॉर्ट मुव्हीज, पोस्टर अॅण्ड ड्रॉईंग, म्युरलर्स, स्ट्रिट प्ले अशा ...

झिंगल स्पर्धेत संग्राम भालकर प्रथम
कोल्हापूर : महापालिकेकडून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत घेण्यात आलेल्या झिंगल, शॉर्ट मुव्हीज, पोस्टर अॅण्ड ड्रॉईंग, म्युरलर्स, स्ट्रिट प्ले अशा ऑनलाईन स्पर्धांचे पारितोषिक वितरण प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात झाले.
शासनाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ या अभियानामध्ये शहरातील नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळावा, या उद्देशाने महापालिकेने ऑनलाईन स्पर्धा घेतल्या. यामध्ये झिंगल, शॉर्ट मुव्हीज, पोस्टर अॅण्ड ड्रॉईंग, म्युरलर्स, स्ट्रिट प्ले आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
झिंगल : प्रथम - संग्राम भालकर, द्वितीय - अमोल गायकवाड, तृतीय - रविराज पोवार.
शॉर्ट मुव्हीज : प्रथम - प्रसाद शेडे, द्वितीय - श्रीधर काटवे, तृतीय - योगिता राजगोळकर.
पोस्टर अॅण्ड ड्रॉईंग - प्रथम - संजय शिंदे, द्वितीय - सोनू गोरल, तृतीय - स्नेहल कांबळे.
म्युरलर्स : प्रथम - अमोल गायकवाड, द्वितीय - राहुल वास्कर, तृतीय - प्रमोद माजगावकर.
स्ट्रिट प्ले - प्रथम - आसावरी लोहार व ग्रुप, द्वितीय - गणेश पाटील, तृतीय - कर्तव्यदक्ष सेना (गणेश पाटील).