क्रीडा संघटक व प्रशिक्षकांचा सांगलीत गौरव

By Admin | Updated: November 27, 2014 00:19 IST2014-11-27T00:03:34+5:302014-11-27T00:19:56+5:30

क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्ह्यातील क्रीडा संघटक व प्रशिक्षकांना शहीद अशोक कामटे स्मृती फौंडेशनतर्फे सन्मानपत्र

Sangliat proud of sports organizer and coaches | क्रीडा संघटक व प्रशिक्षकांचा सांगलीत गौरव

क्रीडा संघटक व प्रशिक्षकांचा सांगलीत गौरव

सांगली : क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्ह्यातील क्रीडा संघटक व प्रशिक्षकांना शहीद अशोक कामटे स्मृती फौंडेशनतर्फे सन्मानपत्र प्रदान करून गौरवण्यात आले. विश्रामबाग चौकात हा कार्यक्रम पार पडला. आ. सुधीर गाडगीळ, स्वातंत्र्यसेनानी बापूसाहेब पाटील, उद्योजक गिरीष चितळे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र प्रदान करण्यात आलेले मान्यवर असे : प्रा. प्रदीपकुमार चव्हाण (हँडबॉल), उदयकुमार पाटील (थांगता), दीपक सूर्यवंशी (खो-खो), डॉ. सुहास व्हटकर (शरीरसौष्ठव), अमोल झांबरे (क्रीडा संघटक), प्रताप पाटील (चॉकबॉल), तिमीर आरवारे (बॅडमिंटन), सुरेश चव्हाण (कराटे), डॉ. आयुब मकानदार (पिकलबॉल), प्रशांत भगत (कबड्डी), दीपक साठे (क्रीडा संघटक), सुनील गोंदकर (शरीरसौष्ठव), चिंतामणी लिमये (बुद्धिबळ), उदय माळी (बॅडमिंटन), आशिष यमगर (हिंदी अध्यापक), संजय चव्हाण (कुस्ती). सामाजिक : अरुणोदय पै (अपघात), प्रा. पी. एस. कांबळे (शैक्षणिक), रामचंद्र जाधव (माजी सरपंच), अ‍ॅड. एस. एम. पखाली (कायदा) यांचाही सत्कार करण्यात आला.

Web Title: Sangliat proud of sports organizer and coaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.