बॉम्बसदृश वस्तूचे सांगली कनेक्शन * जयसिंगपूर व कुरुंदवाड घटनेमध्ये साम्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:23 IST2021-03-25T04:23:31+5:302021-03-25T04:23:31+5:30
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. कुरुंदवाड आणि जयसिंगपूर येथील बॉम्बसदृश वस्तूंशी साम्य असल्याने ...

बॉम्बसदृश वस्तूचे सांगली कनेक्शन * जयसिंगपूर व कुरुंदवाड घटनेमध्ये साम्य
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. कुरुंदवाड आणि जयसिंगपूर येथील बॉम्बसदृश वस्तूंशी साम्य असल्याने या घटनेचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.
येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाडिक हॉटेलमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे यांच्या नावाने बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याने शहरात खळबळ उडाली होती. पोलीस यंत्रणा व बॉम्बशोध पथकाने सतर्कता दाखवत बनावट बॉम्ब मंगळवारी (दि. २३) रात्री बॉम्बशोधक पथकाने नष्ट केले. मात्र शहरात बॉम्ब ठेवून दहशत माजविणाऱ्यांना काय साधायचे होते? नव्याने शिवसेना तालुकाप्रमुख पद मिळालेले वैभव उगळे यांच्या नावाने पार्सल येण्यामागे कारण कोणते याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, दत्तवाड (ता. शिरोळ) येथील अवैध व्यावसायिक नूर काले याच्या फेसबुक अकाउंटवरून आक्षेपार्ह मजकूर सेंड झाल्याने शिवसेनेने कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून काले याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काले समर्थक व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यासमोर राडा झाला होता. यातूनच असा प्रकार झाला आहे की, केवळ स्टंटबाजी झाली आहे हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
चौकट - दोन्ही घटनांत रिक्षाचाच वापर
ताब्यात घेतलेली व्यक्ती सांगलीची असून ती कुरुंदवाड येथे रिक्षाने आली होती. त्यामुळे त्यांना पाठविणारी व्यक्ती कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, जयसिंगपूर येथे पायोस हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश वस्तू ठेवणारी व्यक्तीदेखील रिक्षामधूनच आली होती. त्यामुळे या दोन्ही घटनांत साम्य दिसून येते. त्या दृष्टीने तपास सुरू आहे.