शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

सांगलीत कृषी प्रदर्शनाचा मंडप कोसळला

By admin | Updated: January 17, 2015 00:19 IST

आंबेडकर क्रीडांगणातील घटना : पंधराजण जखमी; संयोजकांसह दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगली : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर भरविण्यात आलेल्या कृषी व पशु प्रदर्शनाचा मंडप कोसळल्याने प्रदर्शन पाहण्यास आलेले १५ लोक जखमी झाले. आज, शुक्रवारी सकाळी अकराला ही घटना घडली. याप्रकरणी प्रदर्शनाचे संयोजन राजेश शहा (रा. इंद्रप्रस्थनगर) व मंडप व्यावसायिक सुनील माळी (कलानगर, सांगली) यांच्याविरुद्ध दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींमध्ये सुभान इकबाल पटेल (वय २२, रा. पद्माळे), श्रीपाल गोपाळराव आचार्य (५०, रा, माधवनगर, ता. मिरज), अजिंक्य प्रकाश पवार (२२, सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्यासह अन्यजणांचा समावेश आहे. जखमींवर विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर प्रदर्शनात प्रचंड गोंधळ आणि आरडाओरड सुरु झाली होती. घटनास्थळी शासकीय व खासगी रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. मदतकार्यासाठी पोलिसांचाही फौजफाटा मोठ्या प्रमाणात दाखल झाला होता. जखमी श्रीपाल आचार्य यांची फिर्याद घेऊन पोलिसांनी शहा व माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ‘रिसोर्सेस’तर्फे दि. १५ ते १८ जानेवारीदरम्यान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनात तीन मोठे मंडप उभे केले आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रदर्शन सुरु होते. त्यावेळी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रवेश करण्यात येणाऱ्या स्टॉलचा मंडप अचानक कोसळला. स्टॉलमध्ये वाहने असल्याने मंडपाचा पत्रा, काठ्या व लोखंडी अँगल त्यावर पडले. स्टॉलमध्ये पन्नासहून अधिक लोक होते. त्यांच्या अंगावरही पत्रे पडले. एका जखमीच्या खांद्यात पत्रा घुसला आहे. घटनास्थळी तातडीने मदत मिळाल्याने अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश आले. (प्रतिनिधी)पावसाची शक्यता असल्याने पत्र्याचा मंडप उभारण्यात आला होता. वाऱ्यामुळे हा मंडप कलून पाच फूट खाली आला. यामुळे २० ते २५ स्टॉलधारकांना याचा फटका बसला. यामध्ये तिघे जखमी झाले. त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले आहेत. आता याठिकाणी कापडी मंडपाची उभारणी केली आहे.- राजेश शहासंयोजक, कृषी प्रदर्शनजिल्हा परिषदेची शहांना नोटीस राजेश शहा यांनी कृषी प्रदर्शनात जिल्हा परिषद सांगली असा उल्लेख केला असून हा कायदेशीर गुन्हा आहे. याप्रकरणी तुमच्यावर फौजदारी कारवाई का करू नये, अशी नोटीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राजेश शहा यांना पाठविली आहे. नोटिसीला उत्तर आल्यानंतर शहा यांच्यावर पुढील कारवाई होणार असल्याचेही सतीश लोखंडे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण भाड्याने न देण्याबाबत मनपाने ठराव केला असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता आयुक्त अजिज कारचे यांनी, घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेण्यात येईल व त्यानंतरच निर्णय घेणार असून भविष्यात प्रदर्शन भरविण्यासाठी मोकळ्या जागेची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.