कोल्हापूर जिल्ह्यात १५ ते २२ डिसेंबरअखेर संघर्ष यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:38 IST2020-12-13T04:38:54+5:302020-12-13T04:38:54+5:30
सावरवाडी : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्याबरोबर केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी अखिल भारतीय किसान ...

कोल्हापूर जिल्ह्यात १५ ते २२ डिसेंबरअखेर संघर्ष यात्रा
सावरवाडी : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्याबरोबर केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वयक समितीतर्फे जिल्ह्यात दि. १५ ते २२ डिसेंबरअखेर संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कौन्सिल सह सचिव नामदेव पाटील यांनी शनिवारी दिली.
आठ दिवस चालणारी ही संघर्ष यात्रा बारा तालुक्यांतून जाणार आहे. शेतकऱ्यांचे प्रबोधन, ठिकठिकाणी जाहीर सभा, माहितीपट, आदी कार्यक्रम होणार आहेत. वडगाव येथे शुभारंभ करूनही संघर्ष यात्रा संपूर्ण जिल्हाभर जाणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.