शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

कोल्हापुरात सलून व्यावसायिकही लोकसभेच्या आखाड्यात, सायकलवरुन येत भरला उमेदवारी अर्ज

By पोपट केशव पवार | Updated: April 18, 2024 15:09 IST

शाहू छत्रपती-संजय मंडलिक यांच्यात मुख्य लढत

कोल्हापूर : लोकशाहीच्या उत्सवात जनमत अनुभवण्यासाठी हौसे, नवसे, गवसे काय करतील याचा नेम नाही. मात्र, या लोकशाहीच्या स्वातंत्र्याचा पुरेपुर वापर कसा करायचा याचा प्रत्यय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील एका सलून व्यावसायिकाने दिला आहे. सरनोबतवाडी (ता.करवीर) येथील संदीप गुंडोपंत संकपाळ या सलून व्यावसायिकाने आज, गुरुवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे सायकलवरुन येत त्याने हा अर्ज भरला. सलग तिसऱ्यावेळी तो लोकसभेच्या आखाड्यात उतरला आहे. संकपाळ यांचे उचगावमध्ये सलूनचे दुकान असून २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते मैदानात होते. विशेष म्हणजे २०१४ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवित त्यांनी दहा हजार ९६३ मते घेतली होती. दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनही त्यांनी एकदा जनमत अनुभवले आहे.शाहू छत्रपती-संजय मंडलिक यांच्यात मुख्य लढतमहायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्यात मुख्य लढत होणार आहे. नेत्यांकडून प्रचारसभेत सुरु असलेल्या टीका-टीपण्णीमुळे जिल्ह्यातील वातावरण तापू लागले आहे. दरम्यानच मंडलिक यांनी शाहू छत्रपती यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने खळबळ उडाली होती. याविरोधात शाहूप्रेमींनी मंडलिकांचा निषेध नोंदवला होता. मतदानाला आता केवळ १९ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रचारसभाचा धुरळा उडणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४