शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संदीप देसाई यांचा भाजप जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 14:53 IST

भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठविला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही राजीनामा मंजूर केला. बॅँकेच्या थकीत कर्जामुळे मालमत्तेच्या जप्तीच्या नोटीससह अन्य काही कारणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा राजीनामा दिला का ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर पदाची सूत्रे उपाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्याकडे दिली आहेत. 

ठळक मुद्देसंदीप देसाई यांचा जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामापदाची सूत्रे उपाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्याकडे

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठविला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही राजीनामा मंजूर केला. बॅँकेच्या थकीत कर्जामुळे मालमत्तेच्या जप्तीच्या नोटीससह अन्य काही कारणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा राजीनामा दिला का ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर पदाची सूत्रे उपाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्याकडे दिली आहेत. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, तसेच व्यवसाय व वैयक्तिक कारणांमुळे पक्षाचे काम पूर्णवेळ करता येत नाही. या कारणास्तव संदीप देसाई यांनी रविवारी राजीनामा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवून तो मंजूर करण्याची विनंती केली. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी त्यांचा राजीमाना मंजूर केला.

देसाई यांनी आजरा अर्बन बँकेच्या व्यवसायासाठी घेतलेले कर्ज थकीत झाल्याने त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची नोटीस जारी करण्यात आली आहे. याबरोबरच न्यायालयातही बँकेने वसुलीबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यासह अन्य काही कारणे त्यांच्या राजीनाम्यामागे आहेत का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

आपल्या पदाचा कार्यकाळ १६ जानेवारी २०१९ ला पूर्ण झाला आहे. आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसाईक कारणांमुळे पक्ष कामाला पूर्णपणे वेळ देता येत नव्हता; त्यामुळे आपण वेळोवेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याकडे राजीनामा अर्ज करत होतो. रविवारी पुन्हा अर्ज पाठविला. त्यानंतर तो मंजूर करण्यात आला. तसेच आजरा अर्बन बॅँकेचे बहुतांश कर्ज फेडले असून, किरकोळ रक्कम थकीत आहे. याचा आणि राजीनाम्याचा काही संबंध नाही.- संदीप देसाई, माजी महानगर जिल्हाध्यक्ष, भाजप

पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यासह वैयक्तिक कारणांमुळे संदीप देसाई यांनी आपल्या पदाचा राजीमाना प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला असून, तो मंजूर करण्यात आला. यानंतर या रिक्त पदांची सूत्रे पालकमंत्री पाटील यांच्याशी चर्चा करून उपाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्याकडे दिली आहेत.- महेश जाधव, अध्यक्ष, प. म. देवस्थान समिती

 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर