भडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:23 IST2021-03-26T04:23:56+5:302021-03-26T04:23:56+5:30
भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेने प्रशासकीय मान्यता दिली. त्यासाठी एकूण ५ कोटी ९२ लाखांचा ...

भडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी
भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेने प्रशासकीय मान्यता दिली. त्यासाठी एकूण ५ कोटी ९२ लाखांचा खर्च येणार असून, पहिल्या टप्यात १ कोटी २० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. २०१३ मध्ये शासनाच्या बृहत आराखड्यात या केंद्राला मंजुरी मिळाली; परंतु जागेअभावी हे केंद्र रेगाळले होते.
दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीने गायरानाची जागा उपलब्ध करून दिल्याने आरोग्य केंद्राचा प्रश्न निकाली निघाला. भडगावसह हुनगिनहाळ, जरळी, शिंदेवाडी, खमलेहट्टी या गावांना या केंद्राचा फायदा होणार आहे.
यासाठी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी उपाध्यक्ष रामाप्पा करिगार, जि. प. सदस्या राणी खमलेहट्टी, माजी सभापती अमर चव्हाण, पं. स. सदस्या श्रीया कोणकेरी, सरपंच बसवराज हिरेमठ, राजू खमलेहट्टी, अनिकेत कोणकेरी आदींनी विशेष प्रयत्न केले.