कुरुंदवाड पालिकेच्या बांधकाम सभापतिपदी समरिन गरगरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:26+5:302021-01-08T05:19:26+5:30

दरम्यान, या निवडीवेळी राष्ट्रवादीचे स्नेहल कांबळे व नर्गीस बारगीर यांनी पक्षप्रतोद पदावर दावा सांगून समिती सदस्यपदासाठी नावे सुचविले होती. ...

Samrin Gargare as the construction chairman of Kurundwad Municipality | कुरुंदवाड पालिकेच्या बांधकाम सभापतिपदी समरिन गरगरे

कुरुंदवाड पालिकेच्या बांधकाम सभापतिपदी समरिन गरगरे

दरम्यान, या निवडीवेळी राष्ट्रवादीचे स्नेहल कांबळे व नर्गीस बारगीर यांनी पक्षप्रतोद पदावर दावा सांगून समिती सदस्यपदासाठी नावे सुचविले होती. मात्र, जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्या निर्णयानुसार कांबळे यांचे पक्षप्रतोद ग्राह्य मानत त्यांनी सुचविलेली नावे वैध ठरविण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीतील पक्षप्रतोदचा वाद चव्हाट्यावर आला आहे.

उपनगराध्यक्ष पद रिक्त असल्याने आरोग्य समिती सभापती निवड होऊ शकली नाही. निवड सभेला विरोधी भाजपच्या सदस्यासह राष्ट्रवादीचे किरण जोंग, नर्गीस बारगीर अनुपस्थित होते. मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले.

सभेला नगराध्यक्ष जयराम पाटील, फारूख जमादार, स्नेहल कांबळे, अक्षय आलासे, दीपक गायकवाड, प्रा. सुनील चव्हाण, प्राजक्ता पाटील, गीता बागलकोटे आदी उपस्थित होते.

फोटो - ०६०१२०२१-जेएवाय-०३-जयराम पाटील, जवाहर पाटील, मुमताज बागवान, समरीन गरगरे.

Web Title: Samrin Gargare as the construction chairman of Kurundwad Municipality