शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: समृद्धी मार्गामुळे वाघबीळ घाटाच्या सौदर्यांला बाधा, दरीतील झाडे तोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 18:02 IST

भूस्खलनाचा धोका वाढला

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : नागमोडी वळणे, घनदाट झाडी, थंड हवेची अनुभूती देणारा रस्ता, सेल्फी पॅाइंट अन् निसर्गरम्य वातावरणाने मन प्रसन्न करणाऱ्या वाघबीळ घाटाच्या सौंदर्याला समृद्धी मार्गाच्या विस्तारीकरणामुळे बाधा निर्माण झाली आहे. तीन किलोमीटर अंतराच्या प्रवासातील घाट माथ्याच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद आता प्रवासादरम्यान प्रवाशांना अनुभवयास मिळणार नाही. नागमोडी वळणे काढून रस्ता सरळ होत आहे. दरीतील झाडे तोडून तेथे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. रस्ते विकासामुळे घाटाच्या निसर्ग सौंदर्यांचे विद्रुपीकरण होत असल्याने निसर्गप्रेमींतून चिंता व्यक्त होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा, पन्हाळा आणि रत्नागिरी या प्रेक्षणीय पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी वाघबीळ घाटातूनच जावे लागते. वेडीवाकड्या वळणांमुळे वाघबीळ घाटाचा प्रवास धोकादायक वाटत असला घाटातील आल्हादायक वातावरणामुळे घाटातील प्रवास आनंददायी वाटत असल्याचे प्रवाशांत चर्चा आहे. रस्ते विकासामुळे तो अनुभव आता अनुभवायला मिळणार नाही.

नलवडे बंगल्यापासून घाटाला सुरुवात होते. अगदी वाघबीळ फाट्यापर्यंतच्या तीन किलोमीटर अंतरापर्यंत अकरा नागमोडी वळणे येतात. घाटातील वळणे काढण्यासाठी डोंगर फोडल्याने घाटाच्या डोंगराचे विद्रुपीकरण झाले आहे. वळणाच्या ठिकाणी असणाऱ्या खोलगट दरीवर भराव टाकून त्यावर सपाटीकरणाचे काम सुरू आहे. हिरव्यागार झाडीसोबत सेल्फी काढताना तरुणाईचे पाय आपोआप घाटाच्या वळणावरील कठड्याकडे वळायाचे. विस्तारीकरणामुळे तो पॅाइंट आता शोधावा लागतो. एकंदरीत समृद्धी मार्गामुळे वाघबीळ घाटाच्या सौंदर्याला बाधा पोहोचल्याने घाटामाथ्याचा आनंद आता प्रवासादरम्यान लुटता येत नाही.

वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोकाजैवविविधतेने नटलेल्या वाघबीळ घाटात घनदाट झाडींमुळे वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याचे अनेक वेळा आढळून आले. राक्षी, धबधबेवाडीच्या जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी वाधबीळ घाटाचा रस्ता ओलांडून पडळवाडीच्या पाझर तलावाकडे येतात. यापुढे मोठा मार्ग ओलांडताना त्यांना त्रास होणार आहे. झाडी तोडून आणि डोंगर फोडून घाटमाथ्याचे अस्तित्व संपविल्याने वाघबीळ घाट परिसर ओसाड दिसत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.भूस्खलनाचा धोका वाढलादळणवळणाच्या दृष्टीने कित्येक वर्षांपूर्वी बनविलेल्या वाघबीळ घाटात कधीच दरड कोसळली नाही की, वाहतूक यंत्रणा कोलमडली नाही, हा इतिहास आहे. समृद्धी मार्गासाठी डोंगर फोडायला सुरुवात केल्यापासून वाघबीळ फाट्याजवळील दुसऱ्या वळणाजवळ भूस्खलन झाले होते. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी डोंगर खोदल्याने दगडाच्या निखळलेल्या कडा ढासळून भूस्खलन होण्याची भीती आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग