‘सीबीआय’कडून समीरची चौकशी
By Admin | Updated: September 18, 2015 00:53 IST2015-09-18T00:53:44+5:302015-09-18T00:53:55+5:30
या पथकाने पोलीस मुख्यालयात एटीएस प्रमुख संजयकुमार यांची भेट घेतली. यावेळी गायकवाड याच्याबाबतीत मिळालेल्या पुराव्यांची पथकाने शहानिशा केली.

‘सीबीआय’कडून समीरची चौकशी
कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपासासाठी दिल्लीहून ‘सीबीआय’चे पथक गुरुवारी सकाळी कोल्हापुरात आले. या पथकातील अधिकाऱ्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पकडलेल्या संशयित आरोपी समीर गायकवाड याची पोलीस मुख्यालयात चार तास कसून चौकशी केली. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याच्याबाबतीत प्राप्त केलेले पुरावे तपासून पाहिले. रात्री उशिरापर्यंत हे पथक तपास कामात व्यस्त होते. दीड वर्षांपूर्वी पुण्यात अज्ञातांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली होती. त्याचा तपास सीबीआय पथक करत आहे. मात्र,आतापर्यंत सीबीआयला कोणतेही धागेदोरे हाती लागले नव्हते. कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी गायकवाड याला अटक केल्यानंतर त्याचा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येशी काही संबंध आहे का? हे पाहण्यासाठी दिल्लीहून सीबीआयचे पथक गुरुवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले.या पथकाने पोलीस मुख्यालयात एटीएस प्रमुख संजयकुमार यांची भेट घेतली. यावेळी गायकवाड याच्याबाबतीत मिळालेल्या पुराव्यांची पथकाने शहानिशा केली. त्यानंतर स्वतंत्र खोलीमध्ये संशयित आरोपी गायकवाड याची चार तास कसून चौकशी केली.
हे पथक रात्री उशिरापर्यंत कोल्हापुरात तळ ठोकून होते. (प्रतिनिधी)