समीरचा गौप्यस्फोट हा अतिरेक : संजयकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2015 00:54 IST2015-11-25T00:48:22+5:302015-11-25T00:54:39+5:30

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) संजयकुमार

Sameer's bluff is a redundancy: Sanjay Kumar | समीरचा गौप्यस्फोट हा अतिरेक : संजयकुमार

समीरचा गौप्यस्फोट हा अतिरेक : संजयकुमार

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याने केलेल्या गौप्यस्फोट हा त्याचा अतिरेक आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्या गौप्यस्फोटाची सखोल चौकशी करण्याचे आदेश तपास अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांना दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू आहे. हा चौकशी अहवाल न्यायालयात सादर केला जाईल, असे राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) संजयकुमार यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गायकवाड याने न्यायालयीन कोठडीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केलेल्या गौप्यस्फोटाची दखल घेऊन अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार ९ आॅक्टोबरला ब्रेन मॅपिंग सुनावणीसाठी कसबा बावडा येथे न्यायालयात समीरसोबतच्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू आहे. याबाबत संजयकुमार म्हणाले, ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी समीरला २५ लाख रुपयांची आॅफर देण्याचा काहीच संबंध नाही. या चाचणीमध्ये तो दोषी निघेलच असे नाही. त्याला प्रत्येक गोष्टीत अतिरेक करण्याची सवय आहे; परंतु त्याच्या गौप्यस्फोटाची चौकशी करून अहवाल न्यायालयास सादर होईल.

Web Title: Sameer's bluff is a redundancy: Sanjay Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.