समीर गायकवाडवर आज दोषारोपपत्र
By Admin | Updated: December 14, 2015 00:49 IST2015-12-14T00:42:40+5:302015-12-14T00:49:51+5:30
समीर सध्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

समीर गायकवाडवर आज दोषारोपपत्र
कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यावर पोलीस आज, सोमवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत. दोषारोपपत्राबाबत पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगली आहे.अॅड. पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर अज्ञातांनी १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळीबार केला होता. मुंबई येथे उपचार सुरू असताना २० फेब्रुवारीला अॅड. पानसरे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या विशेष तपास यंत्रणेने (एसआयटी) समीर गायकवाड याला ताब्यात घेतले. समीर सध्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. एसआयटी प्रमुख संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्या हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दोषारोपपत्राबाबत पोलिसांनी गुप्तता बाळगली आहे. (प्रतिनिधी)