शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

संभाजीराजे निवडणूक प्रचारासाठी गेले अन् आनंदाने नदीतच सूर मारला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 13:14 IST

छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या चांगुलपणाचे आणि साधेपणाचे अनेक उदाहरण दिले जातात.

कोल्हापूरचे - छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज संभाजीराजे यांनी चक्क उन्हाच्या तडाख्यामुळे नदीच्या पाण्यात पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला. विशेष म्हणजे उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले असता, संभाजीराजेंना हा मोह आवरता आला नाही. त्यामुळे त्यांनी नदीत पोहणाऱ्या बाल-गोपालांसह डुबकी घेतली, सूर मारला आणि महाराजांप्रमाणे आपल्या चिमुकल्या मावळ्यांसोबत मनमुराद आनंद लुटला.  छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या चांगुलपणाचे आणि साधेपणाचे अनेक उदाहरण दिले जातात. तर, त्याच घराण्यातील वंशज असलेल्या संभाजीराजे आणि उदयनराजेंच्याही साधेपणाची अनेक उदाहरणे दिली जातात. शेतात बांधावर जाणे, कुठही कट्ट्यावर बसून चहा पिणे, यांसह इतरही उदाहरणे आहेत. कालेजच्या विद्यार्थ्यांत मिसळणे, त्यांच्यासोबत धावणे, गप्पा गोष्टी करणे हेही महाराजांच्या साधेपणाचीच उदाहरणे आहेत. आता, संभाजीराजेंनी ऐन उन्हाळ्यात नदीत सूर मारून सर्वांनाच अचंबित केलं आहे. एरवी ज्या महाराजांना स्वीमिंग पुलात पोहणे, ज्यांना सहज शक्य आहे, त्यांनी असं सर्वांसोबत सार्वजनिक ठिकाणी पोहणे हे नवलच. त्यामुळे महाराजांच्या या सूर मारण्याची सर्वत्र चर्चा होत आहे.  

शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे चंदगडला आले होते. त्यावेळी, तालुक्यातील ढोलगरवाडी येथील  ओढ्यात तरुणांसोबत पोहोण्याचा आनंद लुटला. देशात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक नेता प्रचारात व्यस्त आहे. तर संभाजीराजे हे भाजपकडून खासदार आहेत, त्यामुळे ते महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. संभाजीराजेंना धलगरवाडी येथे रस्त्याकडेला असलेल्या नदीत पोहणारी मुले दिसली. राजेंनी गाडी थांबवली व पोहणाऱ्या मुलांकडे नजर फिरवली. संभाजीराजेंनी अंगावरील कपडे काढले व सुरक्षा रक्षक मनाई करत असतानाही त्यांनी पाण्यात सूर मारला.

संभाजीराजेंचा आवडता तालुका चंदगडकोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका म्हणजे निसर्गाची मुक्त उधळण झालेलं ठिकाण. काजू, फणस आंबे यांच्या बागा आणि अस्सल ग्रामीण बाज टिकवून ठेवलेला हा तालुका. हे माझे अत्यंत आवडते ठिकाण. दोन दिवसांपासून मी चंदगड दौऱ्यावर आहे. असाच एकेठिकाणी जात असताना वाटेत एका नदीवर काही बालगोपाल व तरूण मुले पोहत असल्याचे दिसले. मग मलाही त्यांच्याबरोबर नदीत उतरण्याचा मोह आवरला नाही. आज कित्येक दिवसांनी अशापद्धतीने निसर्गाच्या सानिध्यात आणि आपल्यावर माया करणाऱ्या लोकांबरोबर, असा निर्मळ आनंद लुटता आला. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapur-pcकोल्हापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSwimmingपोहणे