शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजेंचे आज जल्लोषी स्वागत, हत्ती, घोडे, मावळ्यांचा लवाजमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 12:40 IST

सायंकाळी पाच वाजता शिवाजी चौकातून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. हत्ती व घोड्यावर पारंपरिक वेशभूषेतील मावळे, पारंपरिक वाद्य, मर्दानी खेळ, वारकरी पथक, लेझीम पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. हत्तीवरून साखर वाटप करण्यात येणार

कोल्हापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांनी तीन दिवस मुंबईत उपोषण केले. त्यामुळे मागण्या मार्गी लागल्या. उपोषणानंतर ते पहिल्यांदाच गुरुवारी (दि.१०) कोल्हापुरात येत आहे. यावेळी त्यांचे जंगी स्वागत केले जाणार असून, पारंपरिक वाद्यासह शिवाजी चौकातून मिरवणूक काढली जाणार आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असला तरी समाजाच्या इतर मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी खासदार संभाजीराजे मुंबईत आझाद चौकात उपोषणाला बसले होते. तीन दिवस उपोषण सुरू राहिल्याने राज्य सरकारवर दबाव आला आणि चर्चेतून प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या.‘सारथी’ संस्थेला सक्षम करत असताना निधीची तरतूद केली. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. सकल मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मार्गी लागल्याने समाजात आनंदाचा वातावरण आहे. उपोषणानंतर संभाजीराजे पहिल्यांदाच कोल्हापुरात येत असून त्यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला होता. त्यानुसार जय्यत तयारी केली आहे.खासदार संभाजीराजे गुरुवारी दुपारी ४ वाजता कोल्हापुरात येणार असून रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यानंतर ताराराणी पुतळा, छत्रपती राजाराम महाराज, दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज पुतळा, नर्सरी बागेतील शाहू महाराज समाधी स्थळाला भेट देणार आहेत.सायंकाळी पाच वाजता शिवाजी चौकातून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. हत्ती व घोड्यावर पारंपरिक वेशभूषेतील मावळे, पारंपरिक वाद्य, मर्दानी खेळ, वारकरी पथक, लेझीम पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. हत्तीवरून साखर वाटप करण्यात येणार असून, कोल्हापूरकरांनी मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षण