संभाजीराजेंकडून त्या युवकांवर कौतुकाची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:23 IST2021-07-26T04:23:38+5:302021-07-26T04:23:38+5:30

गोवा येथून नाशिककडे चाललेली ट्रॅव्हल्स चालकाने पुराच्या पाण्यात घातली. लोकांनी आरडाओरडा सुरू केल्यावर छत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व गावातील ...

Sambhaji Raje gave a pat on the back to the youth | संभाजीराजेंकडून त्या युवकांवर कौतुकाची थाप

संभाजीराजेंकडून त्या युवकांवर कौतुकाची थाप

गोवा येथून नाशिककडे चाललेली ट्रॅव्हल्स चालकाने पुराच्या पाण्यात घातली. लोकांनी आरडाओरडा सुरू केल्यावर छत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व गावातील युवकांनी मोठ्या धाडसाने त्यांना बाहेर काढले. याची दखल राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बचाव कार्य केलेल्या सर्व तरुणांच्या पाठीवर थाप देऊन सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित देशमुख, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश भराडे, नामदेव गडकरी, संभाजी चव्हाण, एकनाथ लोहार, शशिकांत लोहार, भैरवनाथ चव्हाण, संतोष पाटील, अमोल हासुरकर, अजिंक्य भराडे, अमोल चव्हाण, निखिल भराडे उपस्थित होते.

फोटो ओळ

पांगीरे येथे बहाद्दर तरुणाचे अभिनंदन करताना खासदार संभाजीराजे. यावेळी अमित देशमुख, नीलेश भराडे,संदीप गुरव, शशिकांत लोहार उपस्थित होते.

Web Title: Sambhaji Raje gave a pat on the back to the youth