कोलेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी संभाजी भांबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:25 IST2021-04-07T04:25:48+5:302021-04-07T04:25:48+5:30

नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. संभाजी बाबूराव भांबर यांची निवड ...

Sambhaji Bhamber as the Principal of Kolekar College | कोलेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी संभाजी भांबर

कोलेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी संभाजी भांबर

नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. संभाजी बाबूराव भांबर यांची निवड झाली.

प्राचार्य डॉ. के. आर. पाटील यांच्या सेवानिवृत्तीने हे पद रिक्त झाले होते. संस्थाध्यक्ष अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.

भांबर हे २३ वर्षांपासून महाविद्यालयात इंग्रजी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच शिवाजी विद्यापीठ इंग्रजी अभ्यास मंडळावर सलग दोनदा अध्यक्ष आणि विद्या परिषद सदस्य म्हणून काम पाहत आहेत. आजअखेर त्यांचे ६७ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

यावेळी मनोहर कोळसेकर, कंचन बेल्लद, संजय कांबळे, शशिकांत देसाई, महेंद्र चव्हाण, सदाशिव चौगुले, मोहन शिंदे, रवींद्र हिडदुगी, शशिकांत सलामवाडे, दिनकर पाटील, विठ्ठल आजगेकर उपस्थित होते.

Web Title: Sambhaji Bhamber as the Principal of Kolekar College