सांबरा विमानतळाची भरारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:26 AM2021-01-23T04:26:19+5:302021-01-23T04:26:19+5:30

‘उडाण’द्वारे होणारी विमानांची वाहतूक दिवसेंदिवस वाढतच चालली असून, बेळगाव विमानतळावरून होणाऱ्या विमानांच्या आणि यासोबतच प्रवाशांच्या वाहतुकीचे उच्चांकदेखील वाढत चालले ...

Sambara Airport in full swing! | सांबरा विमानतळाची भरारी!

सांबरा विमानतळाची भरारी!

Next

‘उडाण’द्वारे होणारी विमानांची वाहतूक दिवसेंदिवस वाढतच चालली असून, बेळगाव विमानतळावरून होणाऱ्या विमानांच्या आणि यासोबतच प्रवाशांच्या वाहतुकीचे उच्चांकदेखील वाढत चालले आहेत. दररोज सरासरी २८ विमाने उड्डाण भारत असून, बेळगाव मधून तब्बल ११ शहरांसाठी ही विमानसेवा सुरू आहे. येत्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०२१ मध्ये या विमानसेवेत पुन्हा दोन ठिकाणांचा समावेश होईल. परंतु अद्याप या विमानतळावर मोठ्या विमानांची सेवा सुरू झाली नसून, अनेक प्रवासी बोइंगसारख्या विमानसेवा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत प्रवासी आहेत.

बेळगावचे विमानतळ हे उत्तर कर्नाटकातील केवळ सर्वाधिक उड्डाण भरणारे विमानतळ नसून सर्वाधिक व्यस्त असणाऱ्या विमानतळाच्या यादीत मोडले जाते. राज्यातील बंगळूर आणि मंगळूर सोबत सर्वाधिक सेवा देणाऱ्या विमानतळाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर या विमानतळाच्या नावाचा समावेश होत आहे.

सध्या बंगळुरूसाठी ४, हैद्राबादसाठी ३, मुंबईसाठी २ आणि पुण्यासाठी एक अशी विमाने उड्डाणे भारत असून, इंदोर, सुरत, कडाप्पा, तिरुपती, म्हैसूर, चेन्नई, अहमदाबाद अशा ठिकाणी बेळगाव विमानतळावरून २७ विमानवाऱ्या होत आहेत.

Web Title: Sambara Airport in full swing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.