शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल, तर थेट बोला, समरजीत घाटगे यांचे हसन मुश्रीफ यांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:55 IST

Samarjit Singh Ghatge Bjp Kolhapur- राज्य शासनाने गेल्या सव्वा वर्षात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, वीज बिल माफ आदी शासनाने दिलेले शब्द पाळल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसून, प्रसंगी सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी दिला. माझ्यावर आडून पत्रकबाजी करण्यापेक्षा हिंमत असेल, तर थेट बोलण्याचे धाडस दाखवावे, असे उघड आव्हान त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.

ठळक मुद्देहिंमत असेल, तर थेट बोला, समरजीत घाटगे यांचे हसन मुश्रीफ यांना आव्हान शेतकऱ्यांना दिलेले शब्द शासनाला पाळावेच लागतील

कोल्हापूर : राज्य शासनाने गेल्या सव्वा वर्षात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, वीज बिल माफ आदी शासनाने दिलेले शब्द पाळल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसून, प्रसंगी सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी दिला. माझ्यावर आडून पत्रकबाजी करण्यापेक्षा हिंमत असेल, तर थेट बोलण्याचे धाडस दाखवावे, असे उघड आव्हान त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.राज्यातील शेतकऱ्यांची वीज बिले माफ करू, दोन लाखांवरील शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान मिळावे आदी मागण्यांसाठी समरजीत घाटगे यांनी बुधवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून उपोषण केले.

घाटगे म्हणाले, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण शिवार यात्रा काढली. त्यांच्या वेदना खूप आहेत, राज्य शासनाने सव्वा वर्षाच्या काळात शेतकऱ्यांसह सर्वच घटकांची फसवणूक केली आहे. शासनाला दिलेल्या शब्दांचा विसर पडला आहे, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करत आहे. राजघराण्याबद्दल सातत्याने उल्लेख होतो, आपण राजघराण्यातील नव्हे तर महाराष्ट्राचा सेवक म्हणून उपोषणास बसल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, दिवसभरात नवोदिता घाटगे, वीरेंद्रराजे घाटगे, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार संपतराव पवार, अमल महाडिक, बाबासाहेब पाटील, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई यांनी भेट देऊन आंदोलनात सहभागी झाले. सायंकाळी सव्वासहा वाजता समरजीत घाटगे यांनी उपोषण सोडले.

 

टॅग्स :BJPभाजपाSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेkolhapurकोल्हापूर