शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: समरजीत यांच्याकडून बेकायदा जमीन नावावर, मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप; आंदोलनाचा दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 12:09 IST

'जागा त्यांच्या नावावर कशी झाली याची आम्ही चौकशी करू'

कागल : कागल शहरातील जुने तहसीलदार कार्यालय तसेच त्यास लागून असलेली जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची व नगरपालिकेच्या शाहू हॉलची मिळून सुमारे अडीच एकर जागा महाराष्ट्र शासनाच्या नावावर असताना कागलच्या घाटगे संस्थानिक घराण्यातील सदस्य प्रवीणसिंह घाटगे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे यांनी आपल्या नावावर बेकायदेशीररीत्या करून घेतली असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. असा आरोप राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथील एका जाहीर सभेत केला. समरजीत घाटगे यांनी ही जागा पूर्वरत नगरपालिकेला द्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे. अन्यथा आम्हाला अन्यथा मोठी जनआंदोलन उभे राहील. असा इशाराही त्यांनी दिला.येथील शाहू मेमोरियल हॉल नव्याने बांधण्यात बांधण्यात येणार असून त्याच्या बांधकाम शुभारंभाबद्दल आयोजित कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. त्यापूर्वी भाषणात जिल्हा बँकेचे संचालक भय्यासाहेब माने व माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी या जागेवरून समरजीत घाटगे यांच्यावर आरोप केले. शंभर वर्षांपूर्वी तत्कालीन संस्थानिकांनी ही जागा शासनाला दिली होती. वास्तविक देशात त्यानंतर अशा जागा कोणत्याच संस्थानिकांनी काढून घेतलेल्या नाहीत. मात्र घाटगे यांनी चुकीची कागदपत्रे आणि व्यवहार करीत काही लोकांना हाताशी धरून या जागा आपल्या नावावर केलेल्या आहेत. ही कागलच्या जनतेची फार मोठी फसवणूक आहे. कारण नगरपालिकेचे आरक्षण या जागेवर असून शाहू हॉल नगरपालिकेच्या मालकीचा आहे तर पशुवैद्यकीय दवाखाना जिल्हा परिषदेचा मालकीचा आहे. मग ही जागा त्यांच्या नावावर कशी झाली याची आम्ही चौकशी करू आणि आंदोलनही छेडू असा इशाराही दिला आहे. यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील, चंद्रकांत गवळी तात्यासाहेब पाटील, प्रकाश नाळे, अजित कांबळे, संजय चितारी, असलम मुजावर, सौरभ पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेkagal-acकागल