शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रामनवमीला जन्म झाल्याचे सांगून मुश्रीफ जनतेची फसवणूक करतायत, समरजित घाटगेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 13:56 IST

मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी कागलमध्ये भव्य मोर्चा. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा दावा समरजित घाटगे यांनी केला आहे.

कागल : गोकुळ दुध संघाकडून देण्यात आलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या जाहीरातीत प्रभु श्रीरामांचे नाव चुकीच्या पद्धतीने छापल्यावरुन वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी यावरुन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल चढवला होता. तर या निषेधार्थ मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी कागलमध्ये आज, शुक्रवारी भव्य मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा दावा समरजित घाटगे यांनी केला आहे.मंत्री मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही मागणी घेऊन मोर्चाने आलेल्या समरजित घाटगे यांनी जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत पोलीस ठाण्यातुन जाणार नाही. अशी भुमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे.  दरम्यान मंत्री मुश्रीफ हे जन्म तारीख वेगळी असताना रामनवमीला जन्म झाल्याचे सांगुन जनतेची फसवणूक करीत आहेत असा गंभीर आरोप केला.रामनवमीला मुश्रीफांचा जन्म झाल्याची माहिती खोटी आहे. मुश्रीफांनी जनतेला खोटी माहिती दिली. २४ मार्चला १९५४ ला रामनवमी नव्हती. खोटं बोलून ४० वर्षे जनतेची त्यांनी फसवणूक केली. मात्र, श्रीरामांची थट्टा बहुजन समाज खपवून घेणार नसल्याचा इशाराच त्यांनी यावेळी दिला. यावेळी माजी नगरसेवक सत्यजीत कदम, माजी महापौर सुनिल कदम हेही उपस्थित होते.समरजित घाटगे यांचा मोर्चा निघण्याआधीच सकाळी मुश्रीफ यांनी या वादाबाबत प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी घाटगे याच्यावर घणाघाती टीका देखील केली.समरजित घाटगेंचा स्टंट माझ्या वाढदिवसाला कार्यकर्ते जाहीराती देतात. वाढदिवसाच्या दिवशी मी हजर नसतो. त्यामुळे समरजित घाटगे माझ्या विरोधात तक्रार दाखल करून फक्त स्टंट करीत आहेत. माझ्या वाढदिवसाला लोक दहा वीस पाने जाहीरात देतात या बद्दल यांच्या पोटात दुखत आहे. कागल ही राजर्षी शाहूची नगरी आहे. अशा जातीयवादी प्रवृत्तीला कागलची जनता योग्य जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती.समरजित हे कुंडीत वाढलेले झाडतर, कार्यकर्त्यानी संयम ठेवण्यास सांगत. त्यांना सामाजिक ऐक्य बिघडावयाचे आहे. आपण ते जपणार आहोत. राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणविणाऱ्या समरजित घाटगे यांनी अशा कृत्यामुळे त्यांना काय वाटत असेल. याचा विचार करावा. समरजित घाटगे हे कुंडीत वाढलेले झाड आहे अशी घणाघाती टीकाही केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे