शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

तेलवाला बाबा सलमानचे कोल्हापुरातून पलायन, टक्कलग्रस्तांना औषधासाठी केली होती गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:44 IST

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी घेतली दखल

कोल्हापूर : टक्कल पडलेल्या लोकांना केस येण्यासाठी औषध देणाऱ्याची चौकशी करण्यासाठी महावीर उद्यानात गेलेल्या महापालिकेच्या पथकाचा डोळा चुकवून सलमान ऊर्फ मोहम्मद सोहेलने पलायन केले. त्याच्या घरी पथकाने चौकशी केली; पण कोणतीही कागदपत्रे अथवा औषध मिळाले नाही. याप्रकरणी महापालिका त्याला नोटीस देणार आहे. दरम्यान, औषध नेण्यासाठी रविवारीही महावीर उद्यानात गर्दी होती.‘लोकमत’ने रविवारच्या अंकात ‘लावा तेल, येतील केस ,’ असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, कोल्हापूर आरोग्य विभागाचे उपसंचालक यांच्या सूचनेवरून आरोग्याधिकारी, पंचगंगा रुग्णालयाचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, नागरी आराेग्य केंद्र क्रमांक १०चे वैद्यकीय अधिकारी, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे दोन कॉन्स्टेबल तसेच अन्न व औषध विभागाच्या निरीक्षकांनी सकाळी ११ वाजता येथे भेट दिली. यावेळी टक्कल पडलेले १५० हून अधिक नागरिक सलमानकडून तेल लावून घेत होते. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने राजारामपुरीतील एका सलूनमध्ये पूर्वी काम केल्याचे सांगितले. पथकाने कागदपत्रांची मागणी केली असता त्याने ती घरी असल्याचे सांगितले. ते आणण्यासाठी पथकासोबत त्याच्या घरी निघाले असता त्याने गर्दीचा फायदा घेत जडीबुटी तेलासहित पळ काढला. त्यामुळे पथकाने त्याच्या न्यू पॅलेस रोडवरील घराला भेट दिली, तेव्हा तिथेही कुलूप आढळले.

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी घेतली दखल‘लोकमत’च्या वृत्ताची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दखल घेतली असून, आरोग्य खात्याला चौकशीचे आदेश दिले. आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक, महापालिका तसेच अन्न आणि औषध निरीक्षकांनी कायदेशीर कारवाईसाठी पाऊल उचलले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर