अतिवृष्टीने साळगाव शाळा दोन दिवस पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:59+5:302021-07-30T04:26:59+5:30
अतिवृष्टीमुळे साळगाव (ता. आजरा) येथील प्राथमिक शाळा दोन दिवस पाण्याखाली होती. या महापुराने शाळेची संरक्षक भिंत कोसळली आहे. संगणक, ...

अतिवृष्टीने साळगाव शाळा दोन दिवस पाण्यात
अतिवृष्टीमुळे साळगाव (ता. आजरा) येथील प्राथमिक शाळा दोन दिवस पाण्याखाली होती. या महापुराने शाळेची संरक्षक भिंत कोसळली आहे. संगणक, शालेय दप्तर, ग्रंथालय पुस्तके, फर्निचर, स्वच्छतागृह यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांनी शाळेला भेट देऊन नुकसान झालेल्या साहित्याची शासन स्तरावरून भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.
शाळेच्या चार खोल्या ग्रामस्तरीय कोरोना दक्षता कमिटीकडे असल्याने शालेय साहित्य आणि शालेय दप्तर एका खोलीत दाटीवाटीने भरुन ठेवले होते. हिरण्यकेशी नदीला आलेल्या पुराचे पाणी शाळेत घुसले. त्यात शाळेची संरक्षक भिंत कोसळण्यासह अन्य साहित्याचे नुकसान झाले आहे. याची माहिती मुख्याध्यापिका मंजिरी यमगेकर यांनी दिली.
गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांनी शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. स्वत:तील प्रशासकीय अधिकारी बाजूला ठेवून एक माणूस म्हणून शिक्षकांना धीर दिला. तसेच शाळेचे जे नुकसान झाले आहे, ते शासन स्तरावरुन भरून काढण्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व शिक्षक बँक संचालक संभाजी बापट, तालुकाध्यक्ष मायकेल फर्नांडिस, ग्रामसेवक कांचन चव्हाण, संजय मोहिते, जनार्दन मिटके आदी उपस्थित होते. सत्यवान सोन्ने यांनी आभार मानले.
फोटो ओळी : साळगाव (ता. आजरा) येथील प्राथमिक शाळेचे पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, शेजारी मुख्याध्यापिका मंजिरी यमगेकर, संभाजी बापट आदी उपस्थित होते.
क्रमांक : २९०७२०२१-गड-०२