शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
2
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
3
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
4
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
5
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
6
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी ती म्हणाली 'हो',तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
7
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
8
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
9
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
10
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
11
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
12
दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
13
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
14
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
15
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
16
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
17
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
18
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
19
रायगडमध्ये शिंदेसेना एकाकी? जिल्हा परिषदेत युतीसाठी भाजपा-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बोलणी
20
भारताचा जर्मनीसोबत 8 अब्ज डॉलरचा करार, 6 'सायलेंट किलर' पाणबुड्या चीन-पाकची झोप उडवणार
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election 2026: कोल्हापूर, इचलकरंजीत बुधवारपासून तीन दिवस दारू विक्री बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:08 IST

छुप्या विक्रीवर करडी नजर, खरेदीसाठी गर्दी

कोल्हापूर : महापालिका निवडणुकांमुळे कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरात १४ ते १६ जानेवारीच्या दरम्यान तीन दिवस दारू विक्री व परमिटरूम बीअरबार बंद राहणार आहेत. या काळात दारूची छुपी विक्री होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांची तस्करी आणि विक्रीवर करडी नजर राहणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली.निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून दारूचा वापर होऊ शकतो. असे प्रकार टाळण्यासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील देशी दारू विक्रीची दुकाने, वाइन शॉपी, बीअर शॉपी आणि परमिटरूम बीअर बार सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. बुधवार ते शुक्रवारी रात्रीपर्यंत दारू विक्री बंद ठेवण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्रेत्यांना दिले आहेत.या काळात दारूची छुपी विक्री होऊ शकते. हा धोका लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांकडून संशयितांच्या हालचालींवर नजर राहणार आहे. पोलिसांकडूनही दारू तस्करीतील सराईतांवर कारवाया केल्या जाणार आहेत. विक्रीस बंदी असताना कोणीही आदेशाचे उल्लंघन करून दारू विक्री करू नये, अन्यथा दोषींवर कारवाई केली जाईल, असा इशारा अधीक्षक नरवणे यांनी दिली आहे.खरेदीसाठी गर्दीसलग तीन दिवस दारू विक्री बंद राहणार असल्याने, कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील वाइन शॉपींमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी आहे. यात राजकीय कार्यकर्ते, उमेदवारांच्या समर्थकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. बंद काळात याच दारूचा वापर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur, Ichalkaranji: Liquor ban for three days due to elections.

Web Summary : Due to municipal elections, liquor sales are banned in Kolhapur and Ichalkaranji from January 14th-16th. Authorities are monitoring for illegal sales. Wine shops are seeing increased purchases before the ban.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६