बाजार समितीत सकाळी ७ ते ११ पर्यंत शेतीमालाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST2021-04-25T04:22:58+5:302021-04-25T04:22:58+5:30
(बाजार समिती लोगो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बाजार समित्यांमधील शेतीमाल विक्रीच्या वेळांवर निर्बंध ...

बाजार समितीत सकाळी ७ ते ११ पर्यंत शेतीमालाची विक्री
(बाजार समिती लोगो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बाजार समित्यांमधील शेतीमाल विक्रीच्या वेळांवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत आज, रविवारपासून सकाळी ७ ते ११ या वेळेतच विक्री होणार आहे.
राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बाजार समित्यामधील भाजीपाल्यासह इतर खरेदीसाठी ग्राहक, व्यापारी यांची गर्दी होते. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. बाजार समित्यांमधील सौद्यावेळी होणारी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यातून सौद्याच्या वेळा कमी करण्याचा निर्णय घेतला असून, तशा सूचना जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समित्यांना दिल्या आहेत.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज भाजीपाला, फळे, कांदा-बटाट्याचे सौदे होतात. भाजीपाल्याचे सौदे पहाटे साडेपाच ते नऊ यावेळेत सुरू आहेत. त्यानंतर फळांचे सौदे काढले जातात. कांदा-बटाट्याचे सौदे साधारणता नऊनंतरच सुरू होतात. मात्र शासनाच्या नवीन आदेशानुसार सौद्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, सकाळी ७ ते ११ या चार तासातच भाजीपाल्यासह इतर शेतीमालाची विक्री करता येणार आहे. तरी समितीशी संबंधित व्यापारी, अडते, शेतकरी यांनी यावेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी पत्रकातून केले आहे.