शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

पगारी पुजारी कायदा मुख्यमंत्र्यांपुढे सादर करणार, राज्यमंत्री आदिती तटकरेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 12:19 IST

कोरोनामुळे दोन वर्षे या कायद्याच्या अंमलबजावणीवर कोणतीही चर्चा झाली नाही. पण आता तटकरे यांनी हा विषय गांभीर्याने घेत बुधवारी याची प्राथमिक आढावा बैठक मंत्रालयात घेतली.

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर अधिनियम २०१८ म्हणजे पगारी पुजारी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादर करण्यात यावा. त्यासाठी कार्यालयाला पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यावी, अशी सूचना पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी केली.

मंत्री तटकरे यांनी काही महिन्यांपूर्वी अंबाबाई मंदिराला भेट देऊन येथील विकासकामांची तसेच अंबाबाई मंदिर कायद्याची माहिती घेतली होती. कोरोनामुळे दोन वर्षे या कायद्याच्या अंमलबजावणीवर कोणतीही चर्चा झाली नाही. पण आता तटकरे यांनी हा विषय गांभीर्याने घेत बुधवारी याची प्राथमिक आढावा बैठक मंत्रालयात घेतली. या वेळी अव्वर सचिव आनंद होडावडेकर, कक्ष अधिकारी सुनीता साळुंखे, विशेष कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे उपस्थित होते.या वेळी राज्यमंत्री तटकरे यांना अंबाबाई मंदिर कायदा होण्यामागील पार्श्वभूमी तसेच कायद्यातील तरतुदींची माहिती देण्यात आली. आजपर्यंत कायद्याची अंमलबजावणी का झाली नाही हेदेखील सांगण्यात आले. न्याय व विधी खाते थेट मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येत असल्याने हा कायदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादर करणे गरजेचे आहे, त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली की कायद्याचे सादरीकरण केले जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAditi Tatkareअदिती तटकरे