शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

उशिरा येणे भोवले, कोल्हापूर महापालिकेच्या ११ अधिकाऱ्यांचा पगार कापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:24 IST

नावे नकोत म्हणून धडपड

कोल्हापूर : महापालिकेतील आढावा बैठकीला उशिरा आल्याने गुरुवारी उपायुक्त, सहायक आयुक्तासह ११ अधिकाऱ्यांचा अर्ध्या दिवसाचा पगार प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी कापला. अभ्यागतांना नेहमी उशिरा येणे, काम वेळेत न करण्याचा अनुभव येतोच. पण, पूर्वसूचना देऊनही मनमानी पद्धतीने उशिरा येण्याचा अनुभव प्रशासक मंजुलक्ष्मी यांनाच खुद्द आल्याने त्यांनी थेट लेट कमर्सच्या पगारालाच कात्री लावली.महापालिकेच्या मुख्यालयात प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता आयुक्त कार्यालयात सर्व अधिकारी व खातेप्रमुखांची आढावा बैठक आयोजित केली होती. प्रशासक मंजुलक्ष्मी वेळेत आल्या. त्यावेळी केवळ तीन ते चारच अधिकारी उपस्थित होते. उर्वरित अधिकारी ११.१५ मिनिटांपर्यंत येत राहिले. उशिरा आल्याने ११ जणांना अर्ध्या दिवसाचा पगार कापण्याचा आदेशच काढला. यामुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली.दरम्यान, सायंकाळी अचानकपणे शिवाजी मार्केटमधील कार्यालयांनाही त्यांनी भेट दिली. त्यावेळी प्राथमिक शिक्षण समिती, विवाह नोंदणी व विधी विभागामधील आठ कर्मचारी जाग्यावर नव्हते. त्यांचाही अर्ध्या दिवसाचा पगार कापण्याचे आदेश दिले.

नावे नकोत म्हणून धडपडउशिरा आल्याने पगार कपातीची शिक्षा झालेले काही अधिकारी आपली नावे वृत्तपत्रांत येऊ नये, यासाठी रात्री उशिरापर्यंत धडपडत होते. नावांची यादी बाहेर जाऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात होती.

प्रमुख अधिकारीचबैठकीला उशिरा आल्याने पगार कापलेले अधिकारी असे : उपायुक्त पंडित पाटील, सहायक आयुक्त नेहा आकोडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, उपशहर अभियंता सुरेश पाटील, रमेश कांबळे, वर्कशॉप प्रमुख विजयकुमार दाभाडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, नगरसचिव सुनील बिद्रे, स्थानिक संस्था कर अधिकारी विश्वास कांबळे, कनिष्ठ अभियंता चेतन आरमाळ.

आणखी आठ जणांवरही कारवाईकार्यालयात उपस्थित नसल्याने पगार कापलेले कर्मचारी असे : प्राथमिक शिक्षण मंडळातील कनिष्ठ लिपिक शिरीष शिंदे, जगदीश ठोंबरे, विधी अधिकारी संदीप तायडे, विधी विभागातील कनिष्ठ लिपिक सरिता संकपाळ, शिपाई नितीन कांबळे, सतीश बागडे, विवाह नोंदणी अधीक्षक सुजाता गुरव, पवडी कामगार सोनल जाधव.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर