शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर! गणेशोत्सवाच्या आधीच शिक्षकांचे वेतन जमा, मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश

By संताजी मिठारी | Updated: August 31, 2022 14:28 IST

नियमितपणे दर महिन्याच्या एक तारखेला वेतन जमा करण्यातील सातत्य शिक्षण विभाग आणि वेतन पथकाने ठेवावे

कोल्हापूर : यंदा गणेशोत्सवाच्या प्रारंभापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ११ हजार शिक्षकांच्याबँक खात्यावर ऑगस्ट महिन्याचे वेतन मंगळवारी जमा झाले. त्याची एकत्रित रक्कम ८५ कोटी रुपये इतकी आहे. राज्यातील शिक्षक, कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव आनंदात साजरा करता यावा, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट महिन्याचे वेतन ३१ ऑगस्टपूर्वी जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने कार्यवाही केली.कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, अंशत: अनुदानित, डीएड कॉलेज, सैनिकी शाळांमधील ११ हजार शिक्षकांच्या बँक खात्यावर वेतन जमा करण्यात आले. शासनाने दिलेल्या मुदतीच्या दोन दिवस आधीच वेतन जमा करण्याची कार्यवाही पूर्ण केली असल्याची माहिती वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक रामदास म्हस्के यांनी दिली.दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांचे वेतन जमा करण्याचा निर्णय चांगला आहे. नियमितपणे दर महिन्याच्या एक तारखेला वेतन जमा करण्यातील सातत्य शिक्षण विभाग आणि वेतन पथकाने ठेवावे, अशी मागणी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकbankबँक