‘सखीं’नी घेतल्या फराळाच्या टिप्स
By Admin | Updated: October 19, 2014 00:42 IST2014-10-19T00:35:44+5:302014-10-19T00:42:10+5:30
नावीन्यपूर्ण पदार्थांची निर्मिती

‘सखीं’नी घेतल्या फराळाच्या टिप्स
कोल्हापूर : दिवाळीच्या पारंपरिक पदार्थात थोडा बदल केल्यास नावीन्यपूर्ण पदार्थांची निर्मिती होते, असा कानमंत्र देत पाककलातज्ज्ञ अपर्णा कोलते यांनी सखींना ‘लज्जतदार दिवाळी’चा अनुभव दिला. निमित्त होते ‘लोकमत सखी मंच’ आयोजित फराळाच्या पदार्थांच्या प्रात्यक्षिकांचे. दिवाळीचे औचित्य साधून ‘सखी मंच’ने काल, शुक्रवारी दुपारी तीन ते सहा या वेळेत देवल क्लब येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गुलाब चिरोटे, इंद्रधनुषी करंजी, चटपटी शेव, गोड चंपाकळी असे चविष्ट पदार्थ शिकविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. अपर्णा कोलते, अनिता चित्रुक, ममता जीवतरामानी, इक्रा मणेर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संयोजन समिती सदस्या उमा इंगळे, शाहीन मणेर, राधिका कुलकर्णी, जयश्री होस्पेटकर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. अपर्णा कोलते यांनी सुलभ पद्धतीने विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखविली. एक ग्रॅम सोन्यातील अग्रणी अग्रवाल गोल्डस् यांच्यावतीने तीन विजेत्यांना ठुशी देण्यात आली.