गडहिंग्लज कारखान्यासाठी शरद पवार यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST2021-09-22T04:28:35+5:302021-09-22T04:28:35+5:30
मंगळवारी (२१) मांजरी- पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीचे अध्यक्ष व कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. संग्रामसिंह नलवडे ...

गडहिंग्लज कारखान्यासाठी शरद पवार यांना साकडे
मंगळवारी (२१) मांजरी- पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीचे अध्यक्ष व कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. संग्रामसिंह नलवडे यांनी खासदार पवार यांच्याशी गडहिंग्लज कारखान्याच्या सद्य:स्थितीसंदर्भात चर्चा केली.
ब्रिस्क कंपनीने मुदत संपण्यापूर्वीच कारखाना सोडल्यामुळे संचालकांनी कारखाना स्वबळावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मदत व सहकार्य करावे, अशी विनंती नलवडे यांनी त्यांना केली. त्याबाबत पवार यांनी सकारात्मकता दाखवली आहे, असेही नलवडे यांनी सांगितले.
या संदर्भात चर्चेसाठी पवार यांनी गुरुवारी (२३) मुंबईला बोलवले आहे. कारखान्याचे अध्यक्ष ॲड. श्रीपतराव शिंदे व आपण त्यांना भेटायला जाणार आहोत, असेही नलवडे यांनी यावेळी सांगितले.
२१गड
फोटो ओळी-
पुणे येथे जेष्ठ नेते शरद पवार यांच्याशी डॉ. संग्रामसिंह नलवडे यांनी मंगळवारी चर्चा केली.