शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील प्लॅटफॉर्मच्या कामामुळे सह्याद्री एक्स्प्रेसला ब्रेक, विस्तारीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 11:55 IST

कोल्हापूर : मुंबई - कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करण्याच्या सूचना पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या बैठकीत ...

कोल्हापूर : मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करण्याच्या सूचना पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या बैठकीत जरी करण्यात येत असला आणि प्रवाशांची आग्रही मागणी असली तरी मुंबईत प्लॅटफॉर्म क्रमांक १६ सह इतर दोन प्लॅटफॉर्मचे काम सुरू असल्याने ही गाडी मुंबईपर्यंत धावण्याला त्याचा मोठा अडसर आहे. मार्च महिन्यापर्यंत या प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्याचे आव्हान मध्य रेल्वेकडे आहे.मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईऐवजी पुण्यापर्यंत सोडण्यात येते. त्याची मुदत ३१ डिसेंबर अखेर आहे. त्यानंतर ही गाडी मुंबईपर्यंत सोडावी, अशी आग्रही मागणी प्रवासी करत आहेत. मुंबईपर्यंत धावणारी ही गाडी कोरोना काळापासूनच बंद केली होती. त्यानंतर ही गाडी विशेष रेल्वे म्हणून पुण्यापर्यंत सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. त्यानुसार दोन वेळा या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. परंतु ही गाडी मुंबईपर्यंत सोडावी, अशी मागणी जोर धरू लागली. विशेषत: मुंबईशी ज्यांचा जवळचा संपर्क आणि संबंध आहे अशा चंदगड आणि गडहिंग्लज भागातील प्रवाशांना याची गरज वाटत आहे. त्यामुळे पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या बैठकीत कोल्हापूरचे प्रतिनिधी शिवनाथ बियाणी यांच्यासह अनेकांनी ही गाडी मुंबईपर्यंत सोडण्यासाठी अधिकृत प्रस्ताव दिला आहे. परंतु मुंबईत फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे.मार्च महिन्यानंतर मिळणार गतीही गाडी मार्चपर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर मार्गी लागण्याची शक्यता आहे. याशिवाय मिरज ते पुणे मार्गावरील रहिमतपूर, तारगाव आणि कोरेगाव या ठिकाणच्या दुहेरीकरणाचे कामही सुरू आहे. त्या कामालाही मार्च महिना उलटणार आहे, त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतरच या गाडीला गती मिळेल अशी स्थिती सध्या आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेMumbaiमुंबई