थेरगाव येथील राजर्षी शाहू वाचनालयाचे साहित्य गौरव पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:17+5:302021-02-05T07:06:17+5:30

थेरगाव (ता. शाहूवाडी) : येथील राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार ...

Sahitya Gaurav Award of Rajarshi Shahu Library at Thergaon announced | थेरगाव येथील राजर्षी शाहू वाचनालयाचे साहित्य गौरव पुरस्कार जाहीर

थेरगाव येथील राजर्षी शाहू वाचनालयाचे साहित्य गौरव पुरस्कार जाहीर

थेरगाव (ता. शाहूवाडी) : येथील राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये चंद्रशेखर कांबळे (शेणाला गेलेल्या पोरी- कविता), डॉ. श्रीकांत पाटील (लॉकडाऊन- कादंबरी), डॉ. संभाजी बिरांजे (छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समग्र पत्रव्यवहार- वैचारिक व संशोधनात्मक), बाबूराव शिवराम रोकडे (जसं घडलं तसं- आत्मचरित्र) व विश्वास सुतार (तुकाराम नावाचा संत माणूस-चरित्र)यांच्या साहित्य कलाकृतींना सन २०२० चा राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रवीण महाजन (पुणे) यांना ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल ग्रंथालयाच्या वतीने राजर्षी शाहू ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येणार आहे. राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने दरवर्षी सर्वोत्तम साहित्य कलाकृतीना व ग्रंथालय चळवळीसाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २०२० मध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा कोरोनामुळे होऊ शकला नाही, परंतु गेल्यावर्षीचे हे पुरस्कार लवकरच एका कार्यक्रम सोहळ्यात साहित्यक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वितरित केले जाणार असल्याची माहिती वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत रेडेकर व प्रा. प्रकाश नाईक यांनी दिली आहे.

Web Title: Sahitya Gaurav Award of Rajarshi Shahu Library at Thergaon announced