भारत सरकारच्या सांस्कृतिक निवड समितीवर सागर देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:24 IST2020-12-22T04:24:35+5:302020-12-22T04:24:35+5:30

कोल्हापूर : भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या निवड समितीवर ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांची निवड ...

Sagar Deshpande on the Cultural Selection Committee of the Government of India | भारत सरकारच्या सांस्कृतिक निवड समितीवर सागर देशपांडे

भारत सरकारच्या सांस्कृतिक निवड समितीवर सागर देशपांडे

कोल्हापूर : भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या निवड समितीवर ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फतही राज्यपातळीवर तज्ज्ञ समितीवर देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातील साहित्य, संस्कृती क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना शिष्यवृत्ती आणि फेलोशीप देण्यात येते. यासाठी ही राष्ट्रीय पातळीवर निवड समिती करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. देशपांडे यांचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्यपातळीवर तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. देशपांडे यांचा समावेश करण्यात आला आहे. मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील चिमणे गावचे रहिवासी असलेले डॉ. देशपांडे गेली ३० हून अधिक वर्षे पत्रकारिता आणि लेखन क्षेत्रात कार्यरत आहेत.

२११२२०२० कोल डॉ. सागर देशपांडे

Web Title: Sagar Deshpande on the Cultural Selection Committee of the Government of India