महापालिकेवर सेनेचा भगवा फडकवा : वायकर
By Admin | Updated: October 7, 2015 23:59 IST2015-10-07T23:59:30+5:302015-10-07T23:59:30+5:30
गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. ते पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे आयोजित शिवसेनेच्या हातकणंगले तालुका संपर्क मेळाव्यात बोलत होते.

महापालिकेवर सेनेचा भगवा फडकवा : वायकर
पट्टणकोडोली : सत्ता आल्यानंतर काम कसे करायचे हे दाखविण्यासाठी कोल्हापूर महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ प्रत्येक शिवसैनिकाने घेऊन प्रयत्न करायला पाहिजेत, असे प्रतिपादन
गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. ते पट्टणकोडोली (ता. हातकणंगले)
येथे आयोजित शिवसेनेच्या हातकणंगले तालुका संपर्क मेळाव्यात बोलत होते.
वायकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपने अत्यंत टोकाची भूमिका घेऊन युती तोडली. कोल्हापूर जिल्ह्यात दहा पैकी सहा आमदार शिवसेनेचे आहेत. हे पुढच्यावेळी दहा कसे होतील, यासाठी लोकांच्या गरजा काय, हे शासनदरबारी मांडणे गरजेचे आहे. यासाठी नियोजन आराखड्यावर लक्ष केंद्रित करून लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच कामाच्या जोरावर हातकणंगले मतदारसंघातून आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे निवडून आले आहेत, असे वायकरांनी यावेळी मिणचेकर यांचे कौतुक केले.
संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, आजपर्यंत अनेक मंत्री येत होते, जात होते. त्यांनी सामान्य जनतेशी संपर्क साधला नाही. मात्र, शिवसेनेचे मंत्री हे सर्वसामान्यांत मिसळणारे आहेत. सध्याच्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दुर्बिणीने शोधण्याची वेळ आली आहे. मेळाव्यात आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मार्गदर्शन केले.
मेळाव्यास उपजिल्हाप्रमुख साताप्पा भगवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, महेश चव्हाण, सतीश मलमे, मधुकर पाटील, शहरप्रमुख राजू कोळी, अरुण माळी, बाळासो खराडे, नाना मोठे, बजरंग टोमके उपस्थित होते. (वार्ताहर)