चालक बाळासाहेब कांबळे यांना सुरक्षित सेवा बिल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:23+5:302021-08-21T04:28:23+5:30
दिंडनेर्ली : दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील एसटी चालक बाळासाहेब हिंदुराव कांबळे यांना २० वर्ष सुरक्षित सेवा बिल्ला प्रदान ...

चालक बाळासाहेब कांबळे यांना सुरक्षित सेवा बिल्ला
दिंडनेर्ली : दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील एसटी चालक बाळासाहेब हिंदुराव कांबळे यांना २० वर्ष सुरक्षित सेवा बिल्ला प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विनाअपघात प्रवासी सेवा बजावत असलेल्या चालकांना सुरक्षित सेवा बिल्ला सन्मानाने प्रदान केला जातो . ही बाब चालकांसाठी गौरवास्पद, अभिमानाची असते. संभाजीनगर आगारातील चालक बाळासाहेब हिंदुराव कांबळे यांनी २० वर्ष विनाअपघात सेवा बजावली असून त्यांना स्थानक प्रमुख सागर पाटील यांच्या हस्ते बिल्ला प्रदान करण्यात आला. त्यामुळे संभाजीनगर आगारमार्फत आगार व्यवस्थापक उत्तम पाटील यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभप्रसंगी गणेश बुट्टे, संजय पारधी, राजू राऊत, सुमित घाडगे, दीपक बेलेकर, स्नेहल पाटील, अमोल लांबोरे, अनिल सुतार आदी अधिकारी उपस्थित होते.