शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सेनापती कापशीच्या चप्पलचा परदेशातही डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:40 IST

शशिकांत भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्कसेनापती कापशी : हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या ऐतिहासिक पराक्रमाचा वारसा लाभलेले चिकोत्रा खोºयातील सेनापती कापशी (ता. कागल) हे एक सधन गाव. दोनशे वर्षांपूर्वी येथील गोविंदा लक्ष्मण चव्हाण यांनी येथील राजे घराण्यातील घोरपडे सरकारांना चमड्यापासून एक आकर्षक चप्पलचा जोड करून दिला. तत्कालीन घोरपडे सरकारांनी हा ...

ठळक मुद्दे एका चप्पलच्या जोडची किंमत चार हजार रुपये

शशिकांत भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्कसेनापती कापशी : हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या ऐतिहासिक पराक्रमाचा वारसा लाभलेले चिकोत्रा खोºयातील सेनापती कापशी (ता. कागल) हे एक सधन गाव. दोनशे वर्षांपूर्वी येथील गोविंदा लक्ष्मण चव्हाण यांनी येथील राजे घराण्यातील घोरपडे सरकारांना चमड्यापासून एक आकर्षक चप्पलचा जोड करून दिला. तत्कालीन घोरपडे सरकारांनी हा जोड देवास (उत्तर प्रदेश)सह इतर संस्थानांतील सरकारांना दाखविला. त्यांनाही हा जोड आवडला व त्यांनीही या चप्पलची मागणी केली आणि पाहता पाहता कापशी चप्पलने देश-परदेशांतही आपली हुकमी बाजारपेठ तयार केली. टाटा-बाटाच्या जमान्यात आजही कोणतीही जाहिरात न करता कापशी चप्पलला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.एक कापशी चप्पलचा जोड तयार होण्यास पाच ते सहा दिवस लागतात. चप्पलवरचे आकर्षक रेखीव काम महिला करतात. हे रेखीव कामही चमड्यापासून केले जाते. एका चप्पलच्या जोडची किंमत चार हजार रुपये असून, मागणीप्रमाणेच चप्पल तयार केले जाते. चमडे कठीण करण्यासाठी खूप श्रम घ्यावे लागते.कै. दत्तात्रय कृष्णाजी चव्हाण यांनी स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना कित्येक वर्षे कापशी चप्पलचा जोड तयार करून दिला आहे. आजही त्यांच्या पायाचे माप चव्हाण यांच्या दुकानात उपलब्ध आहे. दत्तात्रय चव्हाण यांच्यानंतर मुकुंद चव्हाण त्यांच्या पत्नी शालन चव्हाण, सूर्यकांत चव्हाण हा पूर्वापार व्यवसाय या ठिकाणी करीत आहेत.ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, देवास, कर्नाटक व महाराष्ट्रातील सरकार घराण्यातून व लोकप्रतिनिधींमधून आजही या चप्पलला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या चप्पलमुळे व्यक्तिमत्त्वात भर पडते, शिवाय नेहमी या चप्पलचा वापर केला तर उन्हाळ्यामध्ये डोळ्यांना रखरखपणा व त्रास होत नाही. शिवाय चप्पल मजबूत व टिकावू असते. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे चप्पल तयार करून कुरिअरने पुरवठा केला जातो.कापशी चप्पलला मोठा इतिहास असून, या चप्पलमुळे कागल तालुक्याचेच नव्हे, तर कोल्हापूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण भारतात व परदेशातही प्रसिद्ध झाले आहे. हा व्यवसाय जतन करून भरभराटीला आणण्यासाठी आता शासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे.आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे व चमड्यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे चरितार्थ जेमतेम चालतो. शासनाकडून या व्यवसायासाठी अनुदान मिळाल्यास हा व्यवसाय पुन्हा जोमाने करणे शक्य होणार आहे. कच्चा माल उपलब्ध होण्यास अडचणी असल्यामुळे हा माल तयार करून ठेवणे परवडत नाही. त्यामुळे मागणीप्रमाणे चप्पल जोड करावे लागतात. कापशी चप्पल हे फक्त सेनापती कापशीमध्येच तयार केले जाते. इतर ठिकाणी याची नक्कल करून या नावाखाली विकून ग्राहकांची दिशाभूल केली जाते. - मुकुंद चव्हाण, कारागीरहा आमचा पारंपरिक चालत आलेला व्यवसाय आहे. चमडे कमवून त्यात कठीणपणा आणण्यास खूप श्रम करावे लागतात. चप्पल आकर्षक दिसण्यासाठी रूपकाम करावे लागते. याकरिता टिकली, जर, रिबिट, रिंग या साहित्यांचा वापर करावा लागतो. हे काम नाजूक व रेखीव असते. त्यामुळे वेळ लागतो. आमच्या येणाºया पिढीनेही हा व्यवसाय करावा, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत; पण कच्च्या मालाचे वाढलेले दर व एक जोड तयार होण्यास लागणारा वेळ पाहता याकरिता शासनानेच आनुदान द्यावे. चप्पल सजावट काम जोखमीचे व वेळखाऊ आहे. तरीही आम्ही हा व्यवसाय जोपासला आहे.- शालन मुकुंद चव्हाणसरसेनापती संताजी घोरपडेंचे संस्थान गावकोल्हापूर संस्थानमधील एकूण नऊ जहागिररींपैकी कापशी हे एक गाव. या गावची भौगोलिक रचना पाहता सभोवती डोंगर आहेत व गावाजवळ आल्याशिवाय गाव दिसत नाही. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर हे गाव वसले आहे. कर्नाटकात मोहिमेवर जाताना अत्यंत सुरक्षित म्हणून त्यावेळच्या राजांनी या गावाची निवड केली. हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे हे संस्थान गाव. यावरून या गावाला ‘सेनापती कापशी’ म्हणून ओळखले जाते.