राहुल पाटील यांच्या निवडीने सडोली, परिते आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:20+5:302021-07-14T04:28:20+5:30
राहुल पाटील सडोलीकर यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निश्चित अशी बातमी दै. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच परिते, सडोली मतदारसंघासह कॉंग्रेस ...

राहुल पाटील यांच्या निवडीने सडोली, परिते आनंदोत्सव
राहुल पाटील सडोलीकर यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निश्चित अशी बातमी दै. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच परिते, सडोली मतदारसंघासह कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते.
सोमवारी दुपारी अध्यक्ष निवड जाहीर होताच दोन्ही मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावागावात फटाके वाजवून जल्लोष केला. तसेच सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राहुल पाटील यांनी सडोली खालसा (ता. करवीर) या त्यांच्या मूळ गावी येऊन ग्रामदैवताचे दर्शन घेतले तसेच कै. हरी रामजी पाटील, कै. रामचंद्र बाबुराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
यावेळी पोलीस पाटील पंकजकुमार पाटील, राजेश पाटील (सडोलीकर) सरपंच अमित पाटील, उदय पाटील, अशोकराव पाटील, महादेव पाटील, महिपती दिंडे, सरपंच अमित पाटील, महादेव मगदूम, सरदार पाटील, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध सहकारी सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ -
सडोली खालसा (ता. करवीर) येथे नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी ग्रामदैवत हनुमानाचे दर्शन घेतले. सोबत त्यांचे बंधू राजेश पाटील, संदीप पाटील, कृष्णात धोत्रे यांच्यासह अन्य कार्यकर्ते.