साधू-संतांचा अवतार कल्याणासाठी

By Admin | Updated: December 2, 2014 00:28 IST2014-12-01T21:24:05+5:302014-12-02T00:28:51+5:30

गोपाळ वास्कर : वडणगेत एकदिवसीय पारायण उत्साहात संपन्न

Sadhus-Saints' avatar for welfare | साधू-संतांचा अवतार कल्याणासाठी

साधू-संतांचा अवतार कल्याणासाठी

वडणगे : ‘जिथे आत्मचिंतन आहे, तिथे मानवी जीवनाचे परिवर्तन होते. साधू-संतांचे भाव, प्रेम पाहता मानवाच्या देहात संत येतात. संतांचा अवतार जगाच्या कल्याणासाठी आहे’, असे विचार गोपाळ अण्णा वास्कर महाराज यांनी मांडले.
वडणगे (ता. करवीर) येथे पार्वती मंदिर परिसरात एकदिवसीय ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सोहळ्यात झालेल्या कीर्तनात ते बोलत होते. अमाप उत्साहात सोहळा झाला.
ते म्हणाले, माणसाने जीवन जगताना साधू-संतांचे विचार, ग्रंथ, चारित्र्याकडे पाहावे. ज्ञानाच्या पलीकडे परमात्मा आहे. परमात्मा जर हवा असेल, तर ज्ञानेश्वरी वाचा. जगाचा विचार करा.
दरम्यान, दिवसभर झालेल्या कार्यक्रमात सकाळी ग्रंथवाचन झाले. ग्रंथवाचनासाठी देवी पार्वती हायस्कूलचे विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्यासह महिलांचा मोठा सहभाग होता. पहाटे काकड आरती, सकाळी ग्रंथमाऊली व व्यासपीठ पूजन, सायंकाळी प्रवचन झाले. हा सोहळा पार पाडण्यासाठी विठ्ठल भजनी मंडळ, तसेच बाळासाहेब पाटील - सवळेकरी, वसंत चंद्रेकर, गणपती चौगले, दीपक पाटील, रघुनाथ चंद्रेकर, आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)


विठ्ठल वास्कर महाराजांचे प्रवचन
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य खरे सुख विसरत आहे. वारकरी सांप्रदायाची परंपरा मानवी जीवनाला सुखाचा मार्ग दाखविते, असे प्रतिपादन माजी न्यायाधीश व वारकरी सांप्रदायाचे अभ्यासक विठ्ठल ऊर्फ दादासाहेब वास्कर महाराज यांनी केले. वडणगे (ता. करवीर) येथे श्री ग्रंथराज पारायणात प्रवचनामध्ये ते बोलत होते. या प्रवचनाकरिता भक्तगणांनी मंडप खचाखच भरला होता. करवीर, पन्हाळा, गगनबावडा, कागल, हातकणंगलेसह राधानगरी तालुक्यातूनही वारकाऱ्यांनी उपस्थिती लावली.

Web Title: Sadhus-Saints' avatar for welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.