शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' गावात दोनशे जणांच्या कुटुंबात बसवला जातो एकच गणपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 16:50 IST

सरनोबत कुटुंबात गणेश उत्सवाच्या सुरुवाती पासूनच सुमारे दोनशे कुटुंबसदस्यामध्ये एकच गणपती बसवण्याची प्रथा अखंडित आहे.

अनिल पाटीलमुरगूड : विभक्त कुटुंब पद्धतीने एकत्र कुटुंबव्यवस्थेची शकले पडली असताना सण समारंभा मधून एकत्र येण्याची वृत्ती हळूहळू लोप पावत आहे. पण याला अपवाद कागल तालुक्यातील यमगे या गावातील सरनोबत कुटुंब आहे. शेकडो वर्षांपासून सुमारे दोनशे सदस्य असणाऱ्या या कुटुंबात एकच गणपती बसवला जातो. सर्व धार्मिक विधी सर्वजण एकत्र येऊन अगदी उत्साहात साजरे करत आहेत. समतेचा, एकतेचा संदेश देणारा सरनोबतांचा गणपती विभक्त कुटुंब व्यवस्थेला नक्कीच मार्गदर्शक आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांनी एकत्र यावे आचार विचारांची देवाण घेवाण व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरवात केली. पण झपाट्याने बदलणाऱ्या समाजव्यवस्थेत हा मूळ हेतू मात्र दूर जाताना पहावयास मिळत आहे. मात्र, यमगे येथील सरनोबत कुटुंबात गणेश उत्सवाच्या सुरुवाती पासूनच सुमारे दोनशे कुटुंबसदस्यामध्ये एकच गणपती बसवण्याची प्रथा अखंडित आहे. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गावी असलेले सर्व सदस्य गणेशोत्सवात एकत्र येतात.धान्य देऊन बनवून घेतली जाते श्री'ची मूर्तीसरनोबत गल्ली येथील सदाशिव दत्तात्रय सरनोबत पाटील यांच्या घरी अगदी विधिवत पूजा करून गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. गावातीलच कुंभार समाजाकडून धान्य देऊन अडीच तीन फूटाची शाडूची आकर्षक मूर्ती बनवून घेतली जाते. गणेशाच्या आगमनासाठी सुमारे पन्नास ते साठजण एकत्रित गणेशाचा जयजयकार करत जाऊन डोक्यावरून गणेश मूर्ती आणतात. गणेशाच्या आगमना पासून विसर्जना पर्यंत घरातील सर्वच सदस्य एकत्र आरती करतात.मुस्लिम बांधवांचाही सहभागीएखाद्या दिवशी प्रवचन कीर्तनाचा कार्यक्रम केला जातो. त्याच दिवशी या परिवारामार्फत महाप्रसादाचे आयोजन केले जाते. शिवाय गौरी जागरण करण्यासाठी दररोज रात्री परिसरातील महिला एकत्रित येत पारंपरिक गीतांचे सादरीकरण करतात. उत्सव काळात शेजारील मुस्लिम बांधवही सर्व कार्यक्रमात सहभागी असतात. गणेश विसर्जन अत्यंत साधेपणाने केले जाते.  त्यामुळे समतेचा संदेश देणारा हा सरनोबतांचा गणपती परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव