सचिन सरनोबत यांनी पदभार स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:17 IST2021-06-06T04:17:41+5:302021-06-06T04:17:41+5:30

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे प्रभारी व्यवस्थापक म्हणून सचिन सरनोबत यांनी पदभार स्वीकारला. आप्पासाहेब निर्मळ यांनी रीतसर त्यांच्याकडे पदभार ...

Sachin Sarnobat took over | सचिन सरनोबत यांनी पदभार स्वीकारला

सचिन सरनोबत यांनी पदभार स्वीकारला

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे प्रभारी व्यवस्थापक म्हणून सचिन सरनोबत यांनी पदभार स्वीकारला. आप्पासाहेब निर्मळ यांनी रीतसर त्यांच्याकडे पदभार सोपवला.

शेतकरी संघात गेली दीड वर्षे आप्पासाहेब निर्मळ हे मुख्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्त होऊनही त्यांच्यावर संचालक मंडळाने जबाबदारी सोपवली होती. सेवानिवृत्त व्यक्तीला मुदतवाढ देताना त्यांना महत्त्वाच्या पदाची जाबाबदारी द्यायची नाही, असा ठराव झाला होता. तरीही निर्मळ हे दीड वर्षे या पदावर कायम राहिले. संचालक मंडळातील अंतर्गत वादानंतर हे प्रकरण चर्चेत आले आणि निर्मळ यांना बाजूला करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार प्रभारी व्यवस्थापक म्हणून सचिन सरनोबत यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. त्यांना कार्यकारी संचालक पदाचे सर्व अधिकार देण्यात आले असून त्यांनी निर्मळ यांच्याकडून रीतसर पदभार स्वीकारला आहे.

फोटो ओळी : शेतकरी संघाचे प्रभारी व्यवस्थापक म्हणून सचिन सरनोबत यांनी माजी मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेन निर्मळ यांच्याकडून पदभार स्वीकारला. या वेळी कर्मचारी संघटनेचे अनंत देसाई, दीपक निंबाळकर उपस्थित होते. (फाेटो-०५०६२०२१- कोल-शेतकरी संघ)

Web Title: Sachin Sarnobat took over