कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन मेनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:23 IST2021-04-02T04:23:49+5:302021-04-02T04:23:49+5:30
कोल्हापूर : येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या सभेत २०२१-२०२२ या वर्षासाठी पदाधिकाऱ्यांची गुरुवारी सर्वानुमते निवड झाली. त्यात अध्यक्षपदी ...

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन मेनन
कोल्हापूर : येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या सभेत २०२१-२०२२ या वर्षासाठी पदाधिकाऱ्यांची गुरुवारी सर्वानुमते निवड झाली. त्यात अध्यक्षपदी उद्योजक सचिन मेनन यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी हर्षद दलाल, सचिवपदी दिनेश बुधले, सहसचिवपदी प्रसन्न तेरदाळकर, खजिनदारपदी कमलाकांत कुलकर्णी यांची फेरनिवड झाली.
स्वीकृत संचालकपदी अभिषेक सावेकर, जयदीप मांगोरे यांची फेरनिवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संचालक श्रीकांत दुधाणे होते. मावळते अध्यक्ष रणजित शाह यांनी त्यांच्या कारकीर्दीतील कामकाजाचा आढावा घेतला. कोरोनाकाळात उद्यमवार्ताचे कामकाज उत्कृष्टपणे केल्याबद्दल संचालक नितीन वाडीकर यांचा आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. असोसिएशनचा श्री. शाहू हॉलमध्ये नवीन प्रकल्प उभारणे, त्याठिकाणी लिफ्टची सोय करण्याबाबत चर्चा करण्यात आली. असोसिएशनच्या अमृतमहोत्सवी वर्षातील विविध कार्यक्रम, उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी सचिव दिनेश बुधले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बाबासाहेब कोंडेकर, संजय अंगडी, अतुल आरवाडे, प्रदीप व्हरांबळे, आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
यंदा असोसिएशनचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू होणार आहे. त्यानिमित्त सर्वांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे. उद्योगांसमोर सध्या कोरोनाचे संकट आहे. उद्योजकांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य राहणार आहे.
-सचिन मेनन
फोटो (०१०४२०२१-कोल-सचिन मेनन (केईए), हर्षद दलाल (केईए), दिनेश बुधले (केईए), कमलाकांत कुलकर्णी (केईए), प्रसन्नकुमार तेरदाळकर (केईए)