सबा तारळे : राधानगरी तालुक्यात अवकाळी पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:45+5:302021-01-08T05:16:45+5:30

कसबा तारळे : राधानगरी तालुक्यात काल (सोमवारी) संध्याकाळपासून सुरू असणारा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

Saba Tarle: Rip of unseasonal rain in Radhanagari taluka | सबा तारळे : राधानगरी तालुक्यात अवकाळी पावसाची रिपरिप

सबा तारळे : राधानगरी तालुक्यात अवकाळी पावसाची रिपरिप

कसबा तारळे : राधानगरी तालुक्यात काल (सोमवारी) संध्याकाळपासून सुरू असणारा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानक झालेल्या पावसामुळे उघड्यावर असणारी जनावरांची वैरण भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काल सोमवार सकाळपासूनच वातावरण ढगाळ बनले होते. सायंकाळी सहानंतर रिमझिम पावसास सुरुवात झाली. रात्री नऊ - दहाच्या दरम्यान काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरीही कोसळल्या. अचानक सुरू झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. जनावरांची वैरण तसेच वीट भिजल्याने वीट व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

फोटो कँप्शन --- अवकाळी पावसाने राधानगरी तालुक्यात हजेरी लावल्याने अडगळीतील छत्र्यांचा आधार नागरिकांना घ्यावा लागला.

छायाचित्र/ रमेश साबळे

Web Title: Saba Tarle: Rip of unseasonal rain in Radhanagari taluka